दि,31,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्यात सन
2024-25 या हंगामी काळात पाऊस/अल्पवृष्टी/अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे
अनेक शेतकर्यांचे पिक पूर्णतः नष्ट झाली होती.सदर नुकसानीचे शासनाच्या सुचनांप्रमाणे
पंचानमे करूनही अनेक पात्र शेतकरी पीक नुकसान होऊन सुध्दा त्यांना नुकसान भरपाईपासून
वंचित राहिल्याचे पात्र यादीतून निदर्शनास आले आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग नुकसान होऊन
त्यांचे पंचनामे होऊन सुध्दा नुकसान भरपाई न मिळाल्याने प्रचंड आर्थिक संकटात सापडला
आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व वंचित शेतकर्यांची पंचनामा यादी पुन्हा तपासणी करून
त्यांना तात्काळ शासनमान्य पीक नुकसान भरपाई बाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी
तसेच शेतकर्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी विनंतीसह निवेदन पत्र मुरबाड पंचायत
समितीचे मा.सभापती तथा भाजपा मुरबाड तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.स्वराताई सचिन चौधरी यांनी मुरबाड तहसिलदारांना दिले आहे.यावेळी निवेदन देतांना साजई सरपंच
नम्रता सासे,वैदेही पाटोळे,भाग्यश्री मार्के उपस्थित होत्या.
Post a Comment