BIG BREAKING NEWS...

प्राची पाटील ह्या मुरबाडच्या मुलीने “मुरबाडी बोलीभाषेच्या “ माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवधीतच मुरबाडकरांची जिंकली मनं

 

दि,31,POL,मुरबाड -

सध्या सोशल मीडियावर मुरबाड ( उत्तर कोकण) एक बिनधास्त, तोंडावर खरं बोलणारी, मातीशी जोडलेली तरुणी विशेष चर्चेत आहे.ती म्हणजे प्राची प्रबोधन पाटील, जी “मुरबाडी बाई माणूस ” या नावाने आपल्या खास ढंगात लोकांशी संवाद साधते. ग्रामीण जीवन, बाईंचा संघर्ष, शेती, गावकी प्रश्न आणि सडेतोड समाजप्रबोधन करणाऱ्या तिच्या विनोदी शैलीतल्या व्हिडिओंनी अल्पावधीतच तिला मोठं नाव मिळवून दिलं आहे.

प्राची ह्या मूळच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातल्या. त्यांच प्राथमिक शिक्षण स्थानिक जिल्हा परिषद शाळा किसळ येथे झालं, आणि पुढे त्या मुंबई विद्यापीठातून इंग्रजी पदवी आणि पदवीयुत्तर शिक्षण इंग्रजी साहित्यात घेतले आहे.(एम.ए.बी.एड )सामाजिक कार्यात रुची असल्यामुळे त्यांनी शार्दूल एजुकेशन फेडरेशन नावाची संस्था गरजू विद्यार्थ्यांकरता सुरू केली आहे जिथे त्या डायरेक्टर आहेत, तसंच रमेश पानसेंनी वर्णिलेल्या आनंद शिक्षण ह्या संकल्पनेवर आधारित बालवर्ग त्या चालवतात आणि शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थी आहेत.शिक्षणाप्रति रूचि त्यांचे सासरे जामघर (वाडा) येथिल सुरेश नाना पाटील यांच्याकडून मिळाले असून शिक्षण क्षेत्रात त्यांचे सहकार्य मोलाचे आहे.

“माझ्या प्रत्येक शब्दामागे इथलं मातीचं खरं जिवंतपण आहे.“मुरबाडीबाई माणूस” ही फक्त व्यक्तिरेखा नाही, ती माझ्या मायमाऊल्यांची जीवनपद्धती आहे. उत्तर कोकणातल्या तमाम बांधवांनी ज्या पद्धतीनं मला ओळख दिली, ती माझ्यासाठी शब्दांपलीकडची आहे. या प्रेमासाठी मी प्रत्येक उत्तर कोकणी माणसाला हृदयपूर्वक धन्यवाद देते. हे तुमचंच व्यासपीठ आहे.मी फक्त तुमचा आवाज बनतेय.” माझ्या वाटचालीत माझ्या आजोळच्या माणसांचा महत्त्वाचा वाटा आहे.आज त्यांच्या मुरबाडी मराठी बोली भाषेच्या व्हिडिओंना जो भरभरून प्रतिसाद मिळत आहे, लोकप्रिय होत आहे याबद्दल त्यांना विचारले असता लहानपणापासून मी खोडकर होति , नविन काहितरी शिकण्याची जिद्द मात्र कायम मनात ठेवत माहेरी आल्यावर अल्याणि व किसळ येथिल ग्रामीण भागातील महिलांच्या बोलि भाषेचे निरिक्षण केले व तसे बोलण्याचा प्रयत्न केला आणी तो यशस्वी झाला याचे श्रेय त्यांनी मुरबाड मधील  महिलांना दिले असुन याची सर्व प्रेरणा किसळचे मा.सरपंच जयवंत पडवळ व माझे मामा रमन पडवळ, विश्वनाथ पडवळ यांचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली असून अल्पवधीतच मला प्रचंड प्रेम व आशीर्वाद देऊन कौतुकाची थाप देणार्या समस्त ठाणे जिल्हासह मुरबाड करांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post