BIG BREAKING NEWS...

आमदार किसन कथोरे यांच्या मागणीला हिरवा कंदील ; बदलापूर मध्ये आता आरटीओ कार्यालय...

BY,दि-08,कुणाल शेलार,मंत्रालय मुंबई -

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील कुळगांव-बदलापूर येथे उपप्रादेशिक कार्यालय व्हावे यासाठी आमदार किसन कथोरे हे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुराव्यासह प्रयत्न करत होते.या मागणी संदर्भात परिवहन मंत्री श्री.प्रतापजी सरनाईक यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती.याबैठकीस उपस्थित राहून आमदार किसन कथोरे यांनी मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली.मी गेल्या पाच वर्षांपासून याविषयाचा पाठपुरावा करीत आहे.तेव्हा शेवटी या बैठकीत मंत्री महोदयांनी कुळगांव बदलापूर येथील उप प्रादेशिक कार्यालयास तत्वत: मंजुरी दिली.मात्र परिवहन विभागाने नगरपरिषदेकडून जागा हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवून जागा ताब्यात घ्यावी,मी त्यास मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देतो,अशा सूचना परिवहन आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत. 

सध्या बदलापूर येथे वाहन चालक पथ तसेच स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.बदलापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला हिरवा कंदील मिळाल्याने मी करीत असलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असल्याचे मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी म्हंटले आहे तर यापुढे लायसन्स काढणे,नूतनीकरण करणे,परमिट काढणे,वाहन रजिस्टेशन करणे,नंबर घेणे यांसह वाहनांसंदर्भातील सर्व कामे आता बदलापूर येथेच होणार आहेत.त्यामुळे बदलापूर आणि परिसरातील वाहन चालकांना कल्याण कार्यालयात जायची गरज लागणार नसून आता त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहे.

बदलापूर,मुरबाड,अंबरनाथ शहर आणि अंबरनाथ ग्रामीण मधील वाहनधारकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.यावेळी परिवहन सचिव,परिवहन आयुक्त,विवेक भीमनवर,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.बारकूल,कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालय, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. मारुती गायकवाड व इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post