दि,03,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड ग्रामीण रूग्णालय हे सुसज्ज शासकीय रूग्णालय म्हणुन सदैव चर्चेत राहिलं आहे.आमदार किसन कथोरे यांनी या रूग्णालयाकडे जतीने लक्ष वेधून अनेक सुविध यंत्रणा उपलब्ध करून दिल्या आहेत.पहिले डॉक्टरांची कमतरता होती हती नाहिशी झाली.सुसज्ज सुविधा नागरिकांना मिळत असल्याने या रूग्णालयात दररोज 600 च्या पुढे उपचार घेण्यासाठी येत असतात.एक्सरे ,रक्ततपासणी,मोफत डायलेसिस सेवा,24 तास डॉक्टर्स परिचारिका अधिपरिचारिका येथे सेवेसाठी तत्पर असल्याचे निदर्शनास येत आहे.याच मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे परिक्षण केंद्राकडून करण्यात आले असता प्रथम क्रमांकाने यच रूग्णालयाला गौरविण्यात आले आहे.परंतु काही जणांकडून याच रूग्णालयाला बोट दाखविण्यात येत असल्याने ग्रामीण भागाचा हा एकमेव मुख्य ठिकाण असल्याने मुरबाड ग्रामीण रूग्णालय हाच एकमेव आधारवड आहे हे विसरता कामा नये.
या रूग्णालयात पहिले सिझर प्रसुती होत नव्हती परंतु आता होऊ लागली त्यातच महत्वाचे म्हणजे अपंग व्यक्तींना शासकीय योजना मिळणेकामी ठाणे येथे फेरफटका मारून दाखले मिळवावे लागत होते याकडे या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी लक्ष वेधून ग्रामीण भागातील अपंग व्यक्तींना ठाणे येथे पायपीट होऊ नये म्हणून आरोग्यविभाग उपसंचालक डॉ.श्री.नांदापूरकर यांच्या सहकार्याने,जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार मार्ग्दर्शनाखाली व डॉ.संग्राम डांगे यांच्या अधिपत्याखाली अपंग व्यक्तींना मुरबाड ग्रामीण रूग्णालयात तपासण्या करून दाखले वाटप करण्यावर शिक्का मोर्तब झाला.डॉ.श्री.डांगे यांच्या येण्याने अपंग व्यक्तींना दिलासा मिळू लागला.त्यातच आठवडयातून एक वार ठरविण्यात आले असून दर गुरूवारी आता मुरबाड ग्रामीण रूग्णालयात अपंग व्यक्तींचे तपासणी करून दाखले वाटप प्रक्रिया सुरू झाली.यामध्ये शरिरातील मुख्य अवयव असलेले डोळे व हाडांच्या तपासणी होऊ लागल्याने अपंग व्यक्तींना आता मुरबाड ग्रामीण रूग्णलयातून दाखले मिळू लागले आहेत.दाखले देतांना जे सत्य आहे व ज टक्केवारी अपंग असल्यावरून लावण्यत येते अशा व्यक्तींना दाखले दिले जात असून आजरोजी पर्यंत तब्बल 300 पेक्षा अधिक अपंग व्यक्तींना मुरबाड ग्रामीण रूग्णालयातून लाभ प्राप्त झालेले असल्याची खात्रीलायक सुत्रांकडून माहिती आहे.
मुरबाड ग्रामीण रूग्णालयात दर गुरूवारी स्वतः
नेत्रशल्यचिकित्सव तथा वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे(एमबीबीएस.डीओ.एमएस) व हाडांचे
तज्ञ डॉ.सनिल विश्वकर्मा नगरिकांच्या सेवेसी तत्पर असतात.हाडांवर आजपर्यंत डॉ.विश्वकर्मा
यांनी 50 च्या वर अपंग व्यक्तींच्या तपासण्या केल्या असून त्यांना दाखले वाटप करण्यात
आलेले आहे.अपंग व्यक्तींना दाखले मुरबाड ग्रामीण रूग्णालयतून मिळत असल्याने अपंग व्यक्तींनी
डॉ.संग्राम डांगे व डॉ.सुनिल विश्वकर्मा यांचे आभार मानले आहे.त्याचबरोबर मुरबाड तालुक्यातील
बहुसंख्य माझ्या अपंग बांधव भगिनींना सदर तपासण्या होत असल्याने दाखले येथेच मिळत असल्याचे
माहिती नसल्याने अधिक माहितीसठी अशा नागरिकांनी मुरबाड ग्रामीण ग्रामीण रूग्णालयाशी
तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन नेत्रशल्यचिकित्सव तथा वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम
डांगे यांनी केले आहे.

Post a Comment