(दि.30,POL - कुणाल शेलार)
मुरबाड तालुक्यात गेल्या अनेक
पिढया जन्मांपासून ख्रिस्ती समाज मोठया प्रमाणात मुरबाड शहरासह तालुक्यात कायम रहिवासी
म्हणून वास्तव्यास आहे.परंतु या समाज बांधवांना दफनभूमीसाठी जागा मुरबाड तालुक्यात नसल्याने
मिळेल तेथे अधिकारी,कर्मचारी यांच्या सांगण्यावर मयताला दफन केले
जात होते.मयत समोर असताना कुटूंबासमोर दुखः आणि त्यातच या मयताला
दफन कुठे करायचा असा अतिशय गंभीर प्रश्न उभा राहायचा.जागा नसल्याने 4 दिशेला मयतांना दफन केल्याची माहिती
उपोषणकर्ते यांनी देऊन दफनभूमीकरिता जागा उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात
आले आले परंतु त्या पत्राची हवी तशी तात्काळ दखल घेतली गेली नाही नसल्याचे सांगण्यात
आले.याबाबत अनेक दफनभूमी मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मोठ मोठया
आश्वासनाचा डोंगर त्यांच्यासमोर मांडून त्यांच्या समाजाचा निवडणूकीवेळी
मतांचा आकडा आपल्या झोळीत सामावून घेतला परंतु तरीही त्यांच्यासाठी उपलब्ध जागा न केल्याने
अखेर एक मयत समोर आणि दफनभूमीसाठी जागा नाही या संतप्त समाजाने मंत्रालयाच्या दालनासमोर
आमरण उपोषणातून न्याय मिळण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली.
सदर निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री सचिवालय,कोकण विभाग
कोकण आयुक्त यांनी तात्काळ या संदर्भात शासकीय जागेचा शोध घेण्यात यावे व त्याबाबत
प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना लेखी पत्रान्वये ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले.त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे श्री.परदेशी साहेब
यांनी तत्काळ संबंधित विभागाला सदर विषय पत्रान्वये कळवून प्रस्ताव सादर करण्याच्या
सुचना दिल्या.सदर पत्र पटलावर आल्याने सदर विषयाबद्दल उपोषणकर्ते
शिष्टमंडळ यांना चर्चेकरिता मुरबाड तहसिलदार कार्यालयात बोलवले असता मुरबाड तहसिलदार
श्री.संदीप आवारी साहेब यांच्याशी चर्चा केली.या चर्चेतून मध्यस्थी असलेल्या वनविभाग हद्दितील जमिनीची मागणी केल्याने श्री.आवारी साहेबांनी सकारात्मकपणे ख्रिस्ती समाजाच्या मागण्यांचा विचार केला आणि
तात्काळ वनविभाग मुरबाड यांना पत्रव्यवहार केला.सदर पत्र मिळताच
वनविभागाचे वनपरिक्षेत्र मुरबाडचे अधिकारी श्रीमती.दर्शना पाटील
यांच्याकडे गेल्याने शिष्ट मंडळासमवेत एक सकारात्मक बैठक पार पडली.या बैठक चर्चेतून वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती.पाटील यांनी जागेच्या पाहणीचे तत्काळ सुचना दिल्या.श्रीमती.पाटील मॅडम यांच्या धडाडी भूमिकेमुळे ख्रिस्ती समाजाला दफनभूमीकरिता जागा मिळवून
देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन देत सदर जागेची
चौकशी करून अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र दिल्याने ख्रिस्ती समाजाने
सदर उपोषणाला तात्पुर्ते स्थगिती दिली आहे.
कोकण विभागीय आयुक्त,निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे,मुरबाड तहसिलदार,नगरपंचायत,वनपरिक्षेत्र विभाग अधिकारी यांच्या लेखी पत्राचा
आदर करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये याची दक्षता
घेत सदर उपोषणला तात्पुर्ती स्थगिती दिली असून सकारात्मक भूमिकेचे ख्रिस्ती समाजाकडून
आभार मानण्यात आले आहे.यावेळी संबंधित मुरबाड तहसिल कार्यालयांतर्गत
श्रीमती.पाटील मॅडम,श्री.घोरपडे भाऊसाहेब,मंडळाधिकारी श्रीमती.कुर्ले मॅडम व त्यांचे सहकारी यांनी या विषयाची दखल घेतांना विशेष मेहनत घेतल्याने
ख्रिस्ती समाजाकडून त्यांचेही धन्यवाद मानण्यात आले.या मागणीला
यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शिष्ट मंडळाचे अॅड.किरण थोरात,पास्टर अंगोल्या यांचे अमुल्य सहकार्य मिळत
असून यावेळी प्रत्येक बैठकीला मोठया संख्येने ख्रिस्ती समाजाचे नागरिक उपस्थित होते.
Post a Comment