BIG BREAKING NEWS...

भिवंडी लोकसभा मतदार संघात कोण मारणार बाजी ; उमेदवार इच्छुकांची नावे चर्चेत...

 

(दि.29,POL - कुणाल शेलार)

लोकसभेच्या निवडणूका लवकरच होणार असल्याचे एक पत्र सोशल मिडीयावर घुमत असून सर्वांच्या नजरा मात्र भिवंडी लोकसभेच्या निवडणूकीकडे लागले असून अनेक इच्छुकांची नावे सध्या चर्चेत आले आहेत.पक्षाच्या ताकदेसमोर सामाजिकतेची ताकद असलेल्या अपक्ष उमेदवार मैदानात उतरणार असल्याने लढतीच्या निवडणूकीत प्रतिस्पर्धी येणार असल्याचे बोलले जात आहे.अनेक समर्थकांनी आपआपल्या इच्छूक उमेदवारांना पाठिंबा जाहिर केले असून कोणी राजकीय धुरा तर कोणी सामाजिक कार्याची धुरा तर कोणी विकासकामांची आखणी करत असल्याने यातूनच येणारी निवडणूक लढतीची जाणार असल्याचे कळून येत आहे.इच्छुक उमेदवारांनी गाव खेडे पाडयापासून एकतेची मुठ बांधली असून यामध्ये कोणी काय विकासकामे केली आणि कोण काय करीत आहे या चर्चेचा कल सध्या प्रतिक्रीयेतून मिळत आहे.काहींची पक्षाची ताकद आहे तर काहींची स्वबळाची ताकद आहे त्यामुळे अद्दयापतरी कोणाच्या परडयात कोणत्या पक्षाचे तिकीट फायनल झाले हे कळून येत नसल्याने कोण भिवंडी लोकसभेच्या निवडणूकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार याकडे मात्र अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.दादा,साहेब,भाऊ,मामा यांच्या सर्वांचीच ताकद भिवंडी लोकसभेमध्ये असल्याने त्यांना पक्षाचे तिकीट मिळाल्यास ही निवडणूक अटीतटीच्या लढतीची जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शक्तीपणाला लावली असल्याने विविध सत्राची चाहूल निवडणूकीत विजयाकडे नेण्यासाठी सक्रियेतून भूमिका साकारत आहेत.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण समोर येऊन विकासपाढा जनतेसमोर सादर करणार ही पध्दत जूनी जरी असली तरी ती नव्या मुद्दयांच्या विकासनिधी कामांचा आराखडयांचा भर घालणार यात शंका वाटत नाही.लोकप्रतिनिधी नक्की पक्षश्रेष्ठीचे काम करत असताना आपल्या मतभेदांचा विचार करतील का ? अशी चर्चा मध्यस्थी होत होती परंतु त्याचे उत्तर निवडणूकीच्या बंद पेटीतून निघणार्या निकालाने मिळतील.हा त्यांचा तो यांचा यातच अंतर्गत गटबाजीचा सुर आता कमी झाल्याने याचा फायदा नक्की पक्षालाच होल की नाही हे पाहायला लागणार आहे त्यामुळे पक्षाच्या उमेदवारासमोर नेमकी कोणती अपक्ष शक्ती या निवडणूकीच्या रिंगणात उतरणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.निवडणूकीच्या काळात अनेक चेहरे मतदारांच्या समोर येतील परंतु त्यापैकी केवळ एकच बलाढय शक्ती बाजी मारणार असल्याने नेमकी ती ताकद पक्षाच्या उमेदवाराची असेल की अपक्ष उमेदवाराची ? याकरिता त्या बंद पेटीतून मतदानाच्या लिडच्या आकडेवारीची प्रतिक्षा निकालाच्या दिवशीपर्यंत करावी लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post