(POL, कैलास बोडके - जुन्नर)
महाराष्ट्र
राज्य मराठी पत्रकार संघात मला एकनिष्ठ,प्रामाणिक व त्यागवृत्ती
असणाऱ्या पत्रकारांची आवश्यक आहे" संघात मला गर्दी पेक्षा दर्दी"
पत्रकारांची गरज असल्याचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस
डॉ.विश्वासराव आरोटे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
शुक्रवार दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सर्वसाधारण सभा शिक्षणमहर्षी स्वर्गीय विलासराव तांबे यांनी स्थापन केलेल्या शरदचंद्र पवार फार्मसी महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती यावेळी डॉ आरोटे उपस्थित पत्रकारांना संबोधित करीत होते.यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी उपस्थित पत्रकारांना स्वीट बॉक्स देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करताना बाळशास्त्री जांभेकर व स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी पत्रकारांनी आपली मनोगत व्यक्त केली याशिवाय फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य दामा सर यांनी देखील सर्व उपस्थित पत्रकारांना कलम व डायरी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.विश्वासराव आरोटे होते यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सुभाष डोके,पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक डेरे,जुन्नर तालुका प्रभारी अध्यक्ष भरत अस्वार,माजी अध्यक्ष राजेश डोके,तालुका संपर्कप्रमुख रवी गजे, कैलास बोडके,नयन डुंबरे, मनोज तांबे,दिपक मंडलिक,मयूर ढोबळे,तुषार चिखले,शौकत शेख,फय्याज इनामदार या पत्रकार सोबत दैनिक समर्थ गावकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर,प्राचार्य दामा सर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार
संघाच्या उत्तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजोग काळदंते यांची
सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.स्वर्गीय विलासराव तांबे यांनी स्थापन
केलेल्या शरदचंद्रजी पवार फार्मसी महाविद्यालय डुंबरवाडी येथे झालेल्या वार्षिक
सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.वार्षिक सभेतील सर्व विषयांना मंजुरी देत ही
सभा खेळी- मेळीत पार पडली. यामध्ये संघाच्या
उत्तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संजोग काळदंते यांची बिनविरोध निवड करण्यात
आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार
संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर यांनी तर आभार पुणे जिल्हा संपर्कप्रमुख
अशोक डेरे यांनी मानले.
Post a Comment