(दि.14,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
पावसाचा जोर कायम
असल्याने पावसाने यावेळी जोरदार मुसंडी मारली आहे.गेल्या 2 दिवसापासून ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील काही गावाचे पुल
पाण्याखाली गेल्याची माहिती कळून येत आहे.त्यातच घोरले गावाबरोबरच चिखले गाव येथील
काळू नदीवरील पुलावरून पाणी गेल्याने पुल पाण्याखाली गेलेे असून या ठिकाणी कोणी
प्रवास करू नये असे आवाहन मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक
श्री.प्रमोद बाबर यांनी तमाम नागरिक प्रवाशांना केले आहे.मागील वर्षी पावसाच्या
जोरदार सरीसह वादळी वार्याचा थैमान हा पाहायल मिळाला आहे.त्यामध्ये शेतीच्या
नुकसानीबरोबर घराचेही पडझाड होऊन नुकसान झाले होते यामुळे यावर्षी संबंधित यंत्रणा
सतर्क राहिली असून नागरिकांना वेळोवेळी महत्वाच्या सुचना दिल्या जात आहे.मुरबाड
तालुक्यातील सर्व विभागीय यंत्रणा जागृत असून कोणताही प्रसंग घडू नये म्हणून आपले
कर्तव्य बजावत आहे.त्याचेच ज्वलंत उदाहरण चिखले काळू नदीवरील पुलावर पाणी असल्याने
मुरबाड पोलीसांनी सदर रस्ता थांबा नावाचे कॅरीबेट लावले आहे.व त्यातुनच या
मार्गाने प्रवास बंद असल्याने संपर्कातील संबंधित नागरिक,प्रवासी,विभागांना कळविले आहे.मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रमोद
बाबर यांनी तालुक्यात अनुकुचित प्रकार घडू नये म्हणून स्वतः रक्षक म्हणून उभे
असल्याने नागरिकांनी वपोनि श्री.बाबर यांचे आभार मानले आहे.


Post a Comment