BIG BREAKING NEWS...

कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रयत्नातुन मुरबाड ते नांदगाव बलिवरे बस सेवा सुरू... अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नांदगाव बलिवरे गावात लालपरी धावणार

 

(दि.06,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

मुरबाड तालुक्यातील नांदगाव येथील नागरिकांना बस सुविधा उपलब्ध नसल्याने याबाबतची माहिती कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्यापर्यंत पाहोचली.गाव तिथे बस सेवा मिळावे म्हणून आमदार किसनराव कथोरे यांचे सदैव प्रयत्न राहिले असून त्या प्रयत्नांमध्ये ते यशस्वीही झालेले आहेत.

          गाव खेडे पाडयात बससेवा काही ठिकाणी नव्हती तेथे आमदार किसनराव कथोरे यांनी बस सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून आज अनेक गावांत लालपरी दिसत असल्याने याचे पाठपुरावा झाल्याने गावागावांत आज बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा आनंद हा गगनाला भिडला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मुरबाड तालुक्यातील नांदगांव बलिवरे या गावात बससेवा उपलब्ध नसल्याने या गावातील नागरिकांची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे.कारण मुरबाड बस आगारातून नांदगांव बलिवरे येथे लालपरी धावणार आहे.सदर बस सेवेचा शुभारंभ आज दि.6 जुलै 2024 रोजी मुरबाड बस आगार येथून महाराष्ट्राचे लाडके व धडाडीचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या शुभहस्ते व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.यावेळी आमदार श्री. कथोरे यांनी नविन बस स्थानक बनविण्यासाठी 13 कोटी मंजूर केले असून लवकरच नवा लूक असेल सदर ते काम प्रगतीपथावर आहे असे बोलतांना सांगितले असून त्याचे व्हिडीओ चित्रीकरण संकल्पना सर्वांनी पाहिले आहेच.

          या कार्यक्रम शुभारंभावेळी सौ.स्वराताई चौधरी(मा.सभापती), मुरबाड नगरपंचायतीचे नागराध्यक्ष मुकेश विशे,ॲड. सचिनदादा चौधरी,मनोज रमेश देसले (समाजसेवक),मुरबाड बस आगार व्यवस्थापक प्रमुख श्री.योगेश सुरेश मुसळे,नितीन मोहपे सर, सुरेश बांगर सर,योगेश राखाडे (स्थानक प्रमुख)नितीन मोहन इंगळे (वाहन चालक),गणेश जरारे (वाहक, कंडक्टर),रमेश गंभीरराव (वाहतूक नियंत्रक),नविन देशमुख(वाहतूक नियंत्रक),न्यू इंग्लिश स्कूल मुरबाडचे मुख्यध्यापक श्री. पाडवी सर, जयवंत कराळे सर,जाधव सर,विकी कोळेकर,यांसह नांदगाव बलिवरे गावातील बबन भुसाळ, विश्वास भुसाळ, तुकाराम फोपे, राम फोपे, अशोक भुसाळ,नागेश भुसाळ, कैलास भुसाळ, योगेश भुसाळ, संदीप कथोरे, अशोक फोपे, किरण फाळे, वसंत कालेकर, विलास शेळके, जानू भांडे, सुरेश भुसाळ, प्रकाश फोपे, मनोहर फोपे, राज भुसाळ, युवराज भुसाळ, छगन फोपे, विठ्ठल शिंगाडे, अविनाश फोपे, रविंद्र फोपे, रोहिदास फोपे, विठ्ठल खंडवी,सखाराम भुसाळ,गणेश कंटे व अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

          यावेळी नांदगांव बलिवरे येथे बससेवा उपलब्ध झाली असून महिलांना 50 टक्के सवलतीचा मोठा फायदा येथील महिलांना होणार असून येथिल नागरिकांसह महिला भगिनींनी कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांचे आभार मानले आहेत.

 

Post a Comment

Previous Post Next Post