(दि.26, POL, मुरबाड -)
सेनापती ह्या क्रांतिकारक हरी नारायण देशमुख यांच्या जीवन चरित्रावर आधारीत सत्य घटनेवर आधारित कादंबरीस मराठी साहित्य मंडळ ह्या अखिल भारतीय मराठी चळवळीचे स्त्रोत असलेल्या मराठी साहित्य मंडळाचा २०२४ चा राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर झाला आहे . महाराष्ट्रातून आलेल्या अनेक कांदबऱ्यांमधून सेनापती ह्या कादंबरीची निवड समितीने पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सेनापती ही कादंबरी शहिद भाई कोतवाल यांचे सहकारी हरी नारायण देशमुख यांच्या जीवनावर आहे.कादंबरीच्या माध्यमातून हरी नारायण देशमुख यांचे जीवनचरित्र पाच भागामध्ये साकारले आहे . गौर कामत कर्जत येथील बालपणापासूनच संघर्षमय जीवन जगलेल्या क्रांतीकारक हरी नारायण देशमुख यांच्या ऐतिहासिक ,सामाजिक लढ्याचे चित्रण कादंबरीत केले आहे . लढ्यातील योगदान आणि स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी केलेले सामाजिक कार्य यावर कादंबरीतून प्रकाश टाकला आहे .
सदर कादंबरीचे लेखन शहीद भाई कोतवाल यांचे जीवनचरित्र लिहिणारे आणि त्यांच्या जीवनावरील चित्रपटाचे लेखन - दिग्दर्शन करणारे साहित्यिक चित्रपट -लेखक /दिग्दर्शक एकनाथ देसले यांनी केले आहे . सदर कादंबरीच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते व सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या उपस्थितीत झाले आहे . तर कादंबरीचे प्रकाशक माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती हिंदुराव हयाआहेत .
सदर पुरस्कार सोहळा रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे मराठी साहित्य मंडळाच्या ७ व्याअखिल भारतीत मराठी साहित्य संमेलनात होणार आहे .
Post a Comment