(दि.28,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
महाराष्ट् राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज बदलापूर पश्चिम येथील बेलवली - मांजर्ली गणेश चौक आमदार जनसंपर्क कार्यालयाजवळ आमदार किसनराव कथोरे व साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्दयमाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात भाजपाचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराची सुरूवात झाली.सकाळी 10 सायं 5 पर्यंत या मोफत आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले असता यामध्ये अँजीयोग्राफी,टीएमटी,डायलिसीस,टू डी ईको,अँजिओप्लास्टी,ईसीजी व अन्य अशा मोफत तपासण्या करण्यात आले.या शिबीराचे वैशिष्टय म्हणजे तपासण्या करून आजार आढळ झाल्यास मोफत उपचारही केले जाणार आहेत.या शिबीरामध्ये बदलापूरमधील नागरिकांनी मोठया संख्येने या शिबीराचा लाभ घेतला.या शिबीराला तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.नागरिकांना काही आरोग्याच्या समस्या असल्याने या शिबीरात आपली हजेरी लावून आपल्या आजारावरील शंकेचे निराकरण केले.जनतेला आरोग्याविषयी असलेल्या समस्या आमदार श्री.कथोरे यांनी जाणल्या आहेत आणि या मोफत आरोग्य सेवा शिबीराचे आयोजन करून त्यांनी जनतेला आधारस्तंभ म्हणून सावली दिली आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या या आरोग्य सेवा शिबीराला नागरिकांनी उपस्थिती दर्शवत तपासण्यांचा लाभ मोफतपणे घेतले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य
शिबीराचे आयोजन केल्याने आमदार किसनराव कथोरे व साई सिटी हॉस्पिटल अंबरनाथ यांचे
नागरिकांनी आभार मानले आहेत.यावेळी स्वीयं सहाय्यक श्री.जालिंदर सावंत यांच्यासह सर्व जवळच्या व्यक्तीनींही या शिबीराचा लाभ घेतला
आहे.
Post a Comment