(दि.28,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड तालुक्यामध्ये 22 वर्षापासुन
अखंडितपणे नामवंत सुरू असलेले सार्इ सिध्देश्वर कॉमर्स क्लासने
असंख्य असे विद्दयार्थी घडविले असून हीच परंपरा आजही जोपासण्यात नंबर एकचे क्लास म्हणून
चर्चेत आले आहे.या क्लासेसचे वैशिष्टय म्हणजे विद्दयार्थ्यांबाबत
परिपुर्ण सुचना पालकांपर्यंत पोहोचविली जात असून विद्दयार्थी हजर गैरहजर, क्लास सुटणे व काही अडचण आल्यास तात्काळ पालकांना संपर्क करून त्याची माहिती
देणे अशा क्लासचे सर्व नियोजन पालकांना प्रभावित करणारे ठरले असून सार्इ सिध्देश्वर कॉमर्स क्लास संचालक मंडळाच्या वतीने सहविचार पालकसभेचे आयोजन करण्यात आले
होते.यावेळी पालकांसह विद्दयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी पालकांकडून विद्दयार्थ्यांच्या अभ्यासाविषयी चर्चा करून विचार मांडण्याची
संधी पालकांना देण्यात आली.पालकांनीही आपले सहविचार मांडून आपला
विद्दयार्थ्यी आपल्या मार्गदर्शनाखाली घडावा अशी मनोभावना यावेळी व्यक्त केली.आयोजित सहविचार पालकसभेत पालकांचे मोठे योगदान या क्लासला आपल्या प्रमुख उपस्थितीत
मिळाले असून याच क्लासमधून तालुक्यातील विद्दयार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत करून मुरबाड
तालुक्याचे नाव बोर्डाच्या यादीत समाविष्ट केले आहे.या क्लासेसच्या
माध्यमातून विद्दयार्थ्यांच्या कलाचाचणी परिक्षा आठवडयातून घेण्यात येत असल्याने विद्दयार्थी
कुठे मागे आहे व त्याला कसे पुढे आणायला पाहिजे याचे अचुक नियोजन करण्यामध्ये सार्इ
सिध्देश्वर कॉमर्स क्लासेसचा हात कोणीही धरू शकत नाही हे या
सहविचार पालकसभेतून सिध्द झाले आहे.पालकांनीही आपल्या विद्दयार्थ्यांला
या क्लासमध्ये प्रवेश घेऊन विद्दयार्थी घडेल ही दुरदृष्टी कायम ठेवून मजबुती दाखविली
आहे.पालकांनी सार्इ सिध्देश्वर कॉमर्स
क्लासेसवर ठेवलेल्या विश्वासावर शिक्षकांनी पुर्णतः विश्वास संपादन केल्याने 22 वर्षाचा अखंडित विद्दयार्थी घडघ्विण्याचा
मानस कायम ठेवला आहे.यावेळी विद्दयार्थी यांना समोरासमोर पालकांसमोर
त्यांच्या अभ्यासातील येणार्या अडचणीविषयी सहविचार सभेतून मांडुन
अजुन काय बदल करायला आहे यावर चर्चा करण्यात आली.यावेळी शिक्षक
श्री.हिंदुराव सर,श्री.भोर्इर सर,श्री.खोळंबे सर सर्व
शिक्षक स्टाफ यांसह पालक विद्दयार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment