(दि.08,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
महाराष्ट्रात श्रावण मास विशेष महिना म्हणून संस्कृतीचा वारसा जपत हा महिना पाळला जात असून या महिण्यात ऐतिहासिक व पारंपारिक सण साजरे केले जातात.याच श्रावण मास महिण्यातील भाऊ बहिणीचे नातं घट्ट करणारा सर्वात मोठा सण म्हणजे रक्षाबंधन.याच रक्षाबंधनचे औचित्याने श्रावण महिण्यातील भगिनींना खऱ्या अर्थाने लाभ व्हावा म्हणून मुरबाड विधानसभेतील सर्व बहिणींना महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांनी अणोखी भाऊभेट दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड विधानसभेतील तमाम महिलांना त्यांचे भाऊ आमदार किसनराव कथोरे यांनी श्री क्षेत्र ञ्यंबकेश्वर दर्शन तीर्थ यात्रेचे आयोजन नियोजन केले आहे यामध्ये मुरबाड विधानसभेत असलेल्या मुरबाड,बदलापूर,कल्याण ग्रामीण यांसह तालुक्यातील आपल्या बहिनींना आगळी वेगळी भाऊभेट देणारे महाराष्ट्राचे एकमेव कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे असून संपुर्ण 1 महिन्याचे हे कार्यक्रम आयोजन केले गेले आहे.यामध्ये नाव नोंदणीसह ठरविलेल्या तारखेप्रमाणे तालुका,गाव असे नियोजन असून या दर्शनात बसेस ची व्यवस्था केली असून सर्व बहिणींकरिता पाणी,नास्ता,जेवणाची व्यवस्था आमदार किसनराव कथोरे यांनी केली आहे.या श्री क्षेत्र ञ्यंबकेश्वर दर्शन तीर्थ यात्रेची सुरूवात काल दि.7 ऑगस्ट 2024 रोजी मुरबाड तालुक्यातील शिरवली व डोंगरन्हावे जि.प.गटातुन करण्यात आली.यावेळी तब्बल नोंदणी एकूण 3 हजार 65 इतक्या महिलांनी श्री क्षेत्र ञ्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले.यावेळी तब्बल 67 बसेस उपलब्धतेची व्यवस्था करण्यात आली.मुरबाड तालुक्यात 5 टप्पे यात्रा कार्यक्रमाचे असून सदर यात्रा कार्यक्रमाचे आयोजन पुढील एक महिने केले आहे.जवळपास 45 ते 55 हजाराच्या आसपासचा आमदार किसनराव कथोरे यांच्या बहिणींचा भाऊ भेटीचा ताफा यात्रेत सहभाग नोंदवून दर्शन करून सुखरूप घरी परतणार आहे.मागील वर्षाची आठवण म्हणून रक्षाबंधन दिवशी मागील वर्षी बहिणींना आमदार किसनराव कथोरे यांणी जादा बसेसची उपलब्धता करून दिली होती आणि यावेळी पुन्हा आपल्या 55 हजार बहिणींना तीर्थ दर्शन घडवुन आणणारे महाराष्ट्रातील एकमेव कार्यसम्राट आमदार किसन कथोरे इतिहासात नोंद होईल असे रक्षाबंधन सण साजरा केला गेला आहे.
अनेक
ठिकाणी विविध राजकीय विरोधकांची टिप्पणी होत असून त्याला आमदार श्री.कथोरे
यांनी दुजारो देऊन केवळ आणि केवळ जनतेचे विचार करणारे लाडके कार्यसम्राट आमदार किसनराव
कथोरे हे बोलत नसून त्यांचे कार्य बोलतात हे अनेक वेळा आपल्या कार्यशैलीतून दाखवून
दिले आहे.आज आमदार श्री.कथोरे यांच्या
55 हजार बहिणी आहेत त्यांना आशिर्वाद सदैव भाऊरायांच्या पाठिशी राहिला
आहे त्यामुळे बाबा,आप्पा,साहेब म्हणून असलेले
आपले भाऊराया आमदार श्री.कथोरे यांची खरी ताकद जनता आहे हे विरोधकांना
कळाले असून त्यांच्या तोफेचा वार फुसका बार होईल हे विधीलिखीत आहे.
Post a Comment