BIG BREAKING NEWS...

श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांच्या वाढदिवसानिमित्त कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते आदिवासी कुटूंबीयांना अन्नधान्य वाटप...

 

(दि.16,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रात ज्यांनी ग्रामीण भागातून जिल्हयात ठसा उमटविला आहे व ज्यांनी खरे ऋणानुबंध जपलेले आहे असे मुरबाडच्या मातीत जन्मलेले भूमिपुत्र तसेच प्रथम नामांकन झालेले आयएसओ रेनबो सराज इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सर यांच्या समाजसेवी कार्याची सदैव चर्चा झालेली आहे.

गरिबातील गरिब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी शाळा सुरू केली असून अल्पदरात आज विद्दयार्थी शिक्षण घेत आहेत.त्यांच्या अंगी असलेल्या चांगुलपणा आणि हसरा चेहरा सर्वांच्या मनाला भाऊन जाणारा आहे.स्वतःच्या शिक्षणात गरिबी आणि परिस्थितीची कमकुवतता त्यांनी जाणली होती त्यातून शिक्षण क्षेत्राची गोडी निर्माण करून त्यांनी गरिबांसाठी शाळा सुरू करून दर्जेदार शिक्षण देऊन अनेक विद्दयार्थ्यांच्या कलागुणांना वाव ही मिळाली आहे.स्वःकष्टानी आज परिस्थितीवर मात करून तालुक्यातील खर्या अर्थाने विद्दयार्थी घडविण्यामध्ये कोणतीच कमीची कसर रेनबो रा इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सर यांच्या अधिपत्याखाली शिक्षकांनी सोडली नाही.

त्याचा निकाल म्हणजे 100 टक्के विद्दयार्थी पास हाच हॅट्रिकतेतून ठरला आहे. आज रेनबो रा इंग्लिश मिडीयम स्कूल तालुक्यात नावलौकिक असून धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक,शिक्षणाबरोबर संस्कार जपणा-या व नाविण्य अशा कार्यक्रमातून विद्दयार्थ्यांना घडीवण्याचे महान कार्य केले गेले आहे.याची दखल शासकीय विभागानेही घेऊन मागील या रेनबो रा इंग्लिश मिडीयम स्कूलने प्रथम क्रमांक पटकावून माझी शाळा पुरस्कार 1 लाखाचे पारितोषिक बक्षिस मिळविले आहे.अतिशय संवेदनशीलतेचे प्रतिक म्हणून ही शाळा आज नावरूपाला आली आहे.

सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणून नैतिकतेतून माणूसकी झरी जपणारे आयएसओ रेनबो रा इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांचे 15 ऑगस्ट रोजी वाढदिवस मोठया आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला.15 ऑगस्ट भारताचे स्वातंञ्य दिन हा आनंद गगनात मावेनासे असताना याच दिवशी श्री.पंढरीनाथ टोले सरांचा वाढदिवसही असल्याने दोन्ही आनंदाचे क्षण हे अविस्मरणीय ठरले आहेत.मुरबाड विधानसभेचे व महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार श्री.किसनराव कथोरे यांनी आपल्या हृदयात असलेले श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सरांना आपल्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

याच वाढदिवसाच्या निमित्ताने ऋणुनाबंध सामाजिक संस्था,शिक्षक व शिक्षकोत्ततर कर्मचारी यांनी संयोजक भूमिकेतून आदिवासी कुटूंबीयासाठी अन्नधान्य वाटपाचे कार्यक्रम आयोजन केले होते यावेळी आदिवासी कुटूंबातील असंख्य महिलांना महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार श्री.किसनराव कथोरे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी श्री.टोले सरांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याचा ठसा जिल्हयासह महाराष्ट्रात उमठावा अशा आपल्या मनोगतासह त्यांना वाढदिवसाच्या व उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी सुरेश बांगर सर,जयवंत कराळे सर,श्री.तेलवणे यांच्यासह मोठया प्रमाणात राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,युवक वर्गांसह शिक्षक,शिक्षकोत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post