(दि.09,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
सुप्रसिध्द गायक
जगदीश पाटील यांचे भाऊ श्री.रविंद्र पाटील यांचे सुपुत्र कु.तन्मय रविंद्र पाटील,वय वर्ष 19 यांचे दि.03/09/2024 रोजी सर्प दंश झाल्याने उपचार
दरम्यान निधन झाले आहे.
ठाणे जिल्हयातील घोडबंदर रोड येथील पांडुरंगवाडी येथे राहणारे कु.तन्मय रविंद्र पाटील राहत होते.त्यांच्या आर्इ वडिल भाऊ बहिणी काका काकी असा परिवार असून कु.तन्मय अभ्यासात अतिशय हुशार होते.पाटील घराणेशाहीचा नावलौकिक करून पद्वीधर शिक्षणाकडे त्यांनी आपला यशस्वी पारंपारिक वसा वळविला होता.14 वी मध्ये शिकणारे कु.तन्मय पाटील यांनी अभिमानाचा तुरा उमटविला होता.त्यांच्या प्रत्येक यशात त्यांचे आर्इ वडिलांसह गायक जगदीश पाटील यांचा सिंहाचा वाटा ठरला.परंतु नशिबापुढे कोणाचं काहीच चालत नाही.नशिबाने खेळी केली आणि बघातच क्षणी होत्याचं नव्हतं झालं.कु.तन्मय पाटील यांचे घराजवळील शेत असून त्या शेतात सोबतीने गेले असता अचानक त्यांना सापाने चावा घेतला.त्या सर्पदंशानंतर त्यांना उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.त्यातुन त्यांचा जीव बचावला परंतु तीन दिवसानंतर अचानक त्यांचे निधन झाले.मित्र मंडळीला कळाल्यानंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त होत असून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येत आहे.लहान वयातच अशी घटना घडणे याचे दुःख पाटील परिवारासह सर्व मित्र मंडळ,आप्तेष्ट नातेवार्इकांना आहे.दशक्रिया विधी गुरूवार दि.12.09.2024 रोजी सकाळी 8 वा.गायमुख रेतीबंदर येथे होणार असून दिवसकार्य विधी शुक्रवार दि.13.09.2024 रोजी सकाळी 11 वा.पांडुरंगवाडी,ओवळा-मोघरपाडा रोड,ओवळा,घोडबंदर रोड,ठाणे येथील राहत्या घरी होणार आहे.आलेले दुःख सरण्याची शक्ती पाटील परिवाराला परमेश्वर देवो हीच प्रार्थना.
Post a Comment