(दि.03,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावात मुरबाड तालुका ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.चे संस्थापक तथा युवासरपंच श्री.चंदु कापडी व त्यांचे सहकारी यांनी कार्यसम्राट आमदार श्री.किसनराव कथोरे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त शेतकरी व महिला बचत गट प्रशिक्षण व शेतकरी बचत गट,35% सबसिडी औजारे विक्री व सभासदांना मोफत विल्हे वाटप,कृषी सल्लागार समिती सदस्य सत्कार सोहळा,प्रगतशील शेतकरी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी महाराष्ट्राचे लाडके,मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार श्री.किसनराव कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी सर्व शेतकरी बांधव,महिला,नागरिकांशी प्रमुख मार्गदर्शनाने शेती विषयक संवाद साधला.आमदार श्री.कथोरे यांनी आपल्या संभाषणात मा.सरपंच चंदु कापडी यांच्या सामाजिक कार्याची धडपड आणि शेतीकरी बांधवाविषयी असलेली तळमळ याचे गुणगान गायले.
त्यांनी आपल्या मनोगतात कळमखांडे गावाच्या विकासात चंदु कापडी यांच्या मेहनतीची धुरा सांगितले तसेच या गावातुन सर्वसामान्य घरातून आमचा चंदु कापडी कधी अशी कंपनी टाकेल हे कधी स्वप्नातही आले नव्हते परंतु तो चमत्कार घडला आणि तो केवळ तुमच्या आशिर्वादाने घडला असल्याचे आमदार श्री.कथोरे यांनी व्यासपिठावरून सांगितले.
आज शेतकरी बांधवाकरिता विविध योजना असून त्याचा लाभ घेण्याकरिता आपण पुढे आलो पाहिजे,केंद्र व राज्य सरकारच्या योजना तुम्हाला या कंपनी किंवा कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून लाभ घेता येतील,सोनचाफा,फणस,शिमला मिर्ची लावा जेणेकरून त्या शेतीला त्या फळाला भाव मिळाला पाहिजे,कोणतेही अडचण येऊ नये म्हणून कृषी अधिकारी यांच्या नेहमी संपर्कात राहिले पाहिजे,माझ्या तर अधिकारी यांना सुचना आहेत कि गरिबाला लाभ पहिले द्दया असेही यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी संवादातेतुन म्हंटले आहे.कळमखांडे गावात पहिले पाहिले तर गाव कसा होता आता बदल झाला आहे.पुल,काँक्रेटीकरण रस्ते,पाणी,सुशोभिकरण,घरकुल या सर्व या गावात आज आले असून विकासाचा मानबिंदु उंचावला आहे.
या कार्यक्रमात महिलांकरिता रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून उद्दयोग म्हणून मशिनी उपलब्ध असून एक नवीन रोजगार हाताला काम म्हणून निर्माण होणार आहे.महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळाला असून वयोवृध्द आर्इ वडिलांनाही 3000 रूपयाचा लाभ मिळणार आहे.ञ्यंबकेश्वर दर्शन यात्रा माझ्या बहिणींना भाऊभेट असून माझ्या आर्इ वडिलांनाही लवकरच तिर्थ दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून गणपती सणानंतर नियोजन करण्यात येणार असल्याचेही या वेळी आमदार श्री.कथोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा.सरपंच तथा मुरबाड तालुका ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.चे संस्थापक चंदु कापडी यांनी चांगल्या विचारातुन माणसं जोडली असून त्याला साथ तुमची असल्याचे सांगत या कंपनीला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.आमदार श्री.कथोरे यांच्या शुभहस्ते शेतकरी बांधव व महिलांना प्रगतशील शेतकरी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.या वेळी व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी अमोल आगवान,कृषी अधिकारी रामचंद्र घुडे,ता.तंत्रज्ञान व्या.आत्मा गोकुल जाधव,स.त्मा.व्यवस्थापन मधुकर कुर्ले,कृषी विभाग अधिकारी वाडीळे बंधू,कृषी पर्यवेक्षक दिनेश पवार,प्रभू एंटरप्रायजेस कोल्हापूर प्रकाश दिंडे,मा.सभापती दिपक पवार,सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार,पदाधिकारी,पत्रकार,गावातील आजी माजी सरपंच,उपसरपंच सर्व सदस्य,ज्येष्ठ नागरिक,शेतकरी बांधव,महिला वर्ग,नवयुवक मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment