BIG BREAKING NEWS...

आमदार किसनराव कथोरे यांच्या विकास कार्याच्या कलेचा सर्वत्रच जलवा ; आता डांबरीकरण नव्हे तर काँक्रेटीकरण रस्ते (भाग क्र.3)

 

(दि.11,POL -कुणाल शेलार,मुरबाड)

    मुरबाड विधानसभेमध्ये पहिले डांबरी रस्ते बोलत होते नंतर खड्डे पडून अपघात होत होते परंतु कालांतराने किसनराव कथोरे यां कार्यसम्राट आमदरांनी कायापालट केली.डांबरीकरणाचे रस्ते बंदच केले अन नव्या आध्याय रचून जिथं डांबरीकरण रस्ते तिथं काँक्रेटीकरण रस्ते झाले,अपघात कमी,खड्डयामुळे जीवीतहाणी टळली यासह गाव खेडे वाडयापाडयात केवळ आणि केवळ काँक्रेटीकरण रस्ते होण्याची वेगवान गती विकासकार्याची धुरा म्हणून पुढे आली.जे कधी स्वप्न विधानसभेच्या जनतेनी पाहिलं नव्हतं ते साक्षात्कारात अवतरले आणि आज मुरबाड विधानसभेचे नाव महाराष्ट्राच्या नकाशात आमदार किसनराव कथोरे यांच्या विकासाच्या पुढाकाराने कोरले गेले.इथं ठेकेदारी बंद करून सर्वसामान्य नागरिक थेट आमदार श्री.कथोरेंशी जोडला गेला.सर्वाधिक निधी आणणारे व विधीमंडळात सर्वात जास्त नागरिकांचे समस्या प्रश्‍न मांडून विकासात्मक बादशाहा ठरलेले आमदार किसनराव कथोरे यांच्या कार्याचा डंका सर्वत्र वाजु लागला.भूसंपादन शेतकर्‍यांचे प्रश्‍न मांडताना बेधडक सत्यता समोरच मांडून त्यांना न्याय मिळवून देतांना आमदार श्री.कथोरे यांनी कोणतीच कसर शासनासमोर सोडली नाही.कधी आरोप प्रत्यारोप झाले तरी आपल्या नैतिकतेतून कामे करत राहिले परंतु कधी झुकले नाही कोणापुढे अशा ढाण्या वाघाची भूमिका साकारणारे आमदार श्री.कथोरे आहेत.सर्वांच्या डोक्यावर व पाठिवर मायेचा हात फिरवला,ज्यांना मोठं केले,जे माझ्यामुळे पद भोगले,ज्यांना विकास निधी उपलब्ध करून दिला,ज्यांना जीव लावला त्यातील काही जण आज पलटले असून अशा माणसाची आता काय किंमत आहे ही जनताच दाखवून देणार असल्याचे मत आमदार किसनराव कथोरे यांनी आमच्याशी बोलतांना मांडले.

    सर्वत्र रस्ते पुर्णतः काँक्रेटीकरण होत असल्याने डांबरीकरण रस्ते आता शिल्लकच राहणार नाही.प्रत्येक गावागावात काँक्रेटीकरण रस्ते होण्यासाठी कोटयावधी निधी उपलब्ध करून दिले असून लवकरच महामार्गाला जोडणारा चारही दिशेचा रस्ता हा काँक्रेटीकरणच असणार आहे त्यामुळे लांब पल्ल्याचा रस्ता आता कमी वेळेतच पार पाडता येणार असल्याचेही आमदार श्री.कथोरे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.

 

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post