(दि.20,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका घोषित झाल्यानंतर सर्वोतपरी
पक्षानी तसेच निश्चितच
असलेल्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला भेटी गाठी देत प्रचाराला सुरूवात केली असून
विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधत बैठकी घेण्यात येत असल्याचे कळून येत आहे.मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांनी 4 वेळा निवडणूक लढविली असून ते आता पाचव्यांदा निवडणूक लढविणार असल्याचे
कळून येत असल्याने त्यांनी मुरबाड विधानसभेतील देवगाव जिल्हा परिषद गटातील
कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी महायुती सरकारने आणलेल्या योजना व केलेली विधानसभेसह
तालुक्यात केलेली विकासकामे हे जनतेपर्यंत घेऊन जाण्याचा सल्ला आमदार श्री.कथोरे यांनी दिला.यावेळी शिरगाव कोळे येथील तरूणांनी भाजपात प्रवेश केला.या संवाद बैठकीला राजेश पाटील,एकनाथ पोगेरे,मोहन सासे,सदानंद सोमणे,अनंता
अहिरे,मनोज सासे,संतोष पवार,नितीन मोहपे सर,जयवंत कराळे सर,पंढरीनाथ टोले सर,कचरू टेकडे,विनायक
अहिरे,हरेश भांडे,रामदास सुतार यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Post a Comment