BIG BREAKING NEWS...

विझन फ्रेंड साकिब गोरे यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी,यूके येथे महात्मा गांधी लीडरशिप पुरस्काराने केले सन्मानित...

 

(दि.03,POL - कुणाल शेलार,ठाणे)

नेहमी जनसमान्यांसाठी सदैव झटणारे,लोकांच्या सेवेसी आपले जीवन अर्पण करणारे,कोणाच्याही मदतीने नव्हे तर आमदार किसनराव कथोरे यांच्या आशिर्वादाने आपल्या उद्दयोगातून मिळणार्‍या नफ्यातून गरिबांची निस्वार्थपणे मदतीसाठी धाऊन जाणारे,हजारो दृष्टिदोष असणार्‍या नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करून मोफत चष्मे वाटपाबरोबर मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रथम पाऊल टाकणारे सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून बसलेले जनसेवक विझन फ्रेंड साकिब गोरे यांच्या कार्याची दखल परदेशात घेऊल त्यांच्या समाजकार्याची चर्चा आता युके सारख्या देशात झाली आहे.

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीदिनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऑक्सफर्डचे महापौर यांच्या सहकार्याने एनआरआय वेल्फेअर सोसायटी,यूके चॅप्टर यांनी कार्यक्रम आयोजित केले होते.या कार्यक्रमात महात्मा गांधीजी यांच्या तत्वांना मूर्त रूप देणार्‍या 42 देशांतील जागतिक अनिवासी भारतीयांचा गौरव करण्यात आला.यामध्ये ठाणे जिल्हयाचे भुमिपुत्र,दिनदुबळयांची सेवा करणारे विझन फ्रेंडचे साकिब गोरे यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी,यूके येथे महात्मा गांधी लीडरशिप पुरस्काराने सन्मानित केले असून त्यांच्या जिवनातील हा पुरस्कार त्यांनी आदरणीय आमदार श्री.किसनराव कथोरे यांच्यासह तमाम मायबाप जनतेच्या आशिर्वादाने मिळाले असल्याचे आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.त्यांना नेहमी मिळालेली शिकवण म्हणजे आपण जनतेचे भाऊ,मुलगा आहोत त्यांची सेवा करणं म्हणजे साक्षात परमेश्‍वराची सेवा करणे आहे याच त्यांच्या माणूसकी झरी जपण्याचा पडसाद जगभर उमटला असल्याने एक आदर्श व्यक्तीमत्वाचा अर्थात साकिब गोरे यांचा पुरस्काराने झालेला सन्मान भारताच्या नकाशात सुवर्ण अक्षरात कोरले जार्इल,भारताचे नावलौकिक करण्यात त्यांचे योगदान अमुल्य ठरले जार्इल यात तिळमात्र शंकाच नसणार.

          गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, "तुम्ही जगात जे बदल पाहू इच्छिता ते व्हा." माझे ध्येय जगाला स्पष्टपणे पाहण्यास मदत करणे हे आहे,दृष्टी आणि समज दोन्ही.चला एकत्र पाहूया याच विचार प्रेरणेने विझन फ्रेंड साकिब गोरे प्रभावित होऊन जनतेची सेवा मोठया जोमाने करतांना दिसले आहेत.

 

Post a Comment

Previous Post Next Post