BIG BREAKING NEWS...

आमदार किसनराव कथोरे यांना भाजपाकडुन उमेदवारी जाहिर...

 

(दि.20,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका घोषित झाल्यानंतर प्रत्येक पक्षांनी आपआपले उमेदवार निवडीकडे लक्ष केंद्र केले असता काही पक्षातील उमेदवारांच्या निवडीची यादी तयार झाली असता भारतीय जनता पार्टीकडुन आज पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये 99 उमेदवारांचा समावेश करण्यात आला.या यादीचं वैशिष्टय लक्षात घेतले असता ज्यांचं काम बोलतं आणि ज्यांचा विकास आहे अशा विद्दयमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.

यामध्ये नागपूर दक्षिण पश्‍चिममधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी देण्यात आली असून मुरबाड विधानसभेचे विद्दयमान असलेले आमदार श्री.किसनराव कथोरे यांना मुरबाड विधानसभेतुन पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी श्रेष्ठी यांनी दिली आहे.या 99 जाहीर झालेल्या उमेदवारीच्या यादीत 99 पैकी 13 मतदार संघात पक्षाकडून महिलांना निवडणूकीचे तिकीट देण्यात आले असल्याचे कळते तर मुरबाड विधानसभेतुन आमदार किसनराव कथोरे यांना पुन्हा संधी मिळाल्याने सर्वत्र ठिकाणी आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post