BIG BREAKING NEWS...

किसन कथोरे तुम्ही निधी आणण्यात एक्सपर्ट ; तुतारी,पिपाणी बंद पाडा;तुमची गाठ कथोरेंशी नाही तर माझ्याशी आहे,"ये तो ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है" - मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

(दि.18,POL, कुणाल शेलार - मुरबाड)

आज गौरी हॉल,मांजर्ली बदलापूर येथे भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँगे्रस-आर.पी.आय (आठवले गट) -श्रमजीवी संघटना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारार्थ महायुती कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या राज्याचे मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी मा.मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे स्वागत करून त्यांच्यासमोर विविध विषयाची रचना समोर मांडली.यावेळी व्यासपिठावरील प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगते महायुती कार्यकर्ता समोर मांडली.

अखेर मा.मुख्यमंत्री श्री.शिंदे यांचे संबोधनातून एकच टाळयांचा आवाजात जयघोषाचा विजयी गुलाल उधळण्याचा नारा घुमु लागला.मा.मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी कथोरे साहेब मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे असे म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवारावर जोरदार निशाणा साधला.किसन कथोरेंनी अनेक विकासकामे केलीत जे काँक्रेटीकरणाचे रस्ते केलेत तसेच त्यांचे विकासकामेही काँक्रेटीसारखे मजबूत आहेत,किसन कथोरे तुम्ही निधी आणण्यात एक्सपर्ट आहेत,किसन कथोरे यांच्या विकासकामांचा सदैव ढोलताशा वाजत असल्याने तुतारी आणि पिपाणीला थाराच नाही असे म्हणून आज बाळासाहेब ठाकरे साहेब माझ्या मागे ठामपणे उभे राहिले असल्यामुळेच शेतकर्‍यांचा,गरिबांचा आणि या जनतेचा एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री झाला आहे.

येथे भ्रष्टाचार,चापलुसी,घराणेशाही किड पुन्हा मतदार संघात वाढता कामा नये यासाठी आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी कथोरे यांच्य पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे.तसेच मा.मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विरोधी सत्ताधारी यांचा समाचार घेतला आहे.आमच्यावर विरोधक आरोप प्रत्यारोप करित करून त्यांच्या हातात सत्ता आल्यावर अनेक चौकशा लावू,लाडक्या बहिणींच्या योजनेची चौकशी लावू,जेलमध्ये टाकू असे म्हणतात,पण आपण एकत्र येऊन विकास कामांवर चर्चा करू,महाराष्ट्र कसा पुढे नेता येईल असे बोलायला पुढे येत नाहीत,परंतु मी त्यांना एकच सांगतो की आम्ही जनतेसाठी कितीही वेळा जेल मध्ये जाऊ,आम्ही दिल्लीला शेतकर्‍यांना पैसे आणायला जातो,रस्तेसाठी जातो,जी कामे महायुती सरकारने 2 ते सव्वा दोन वर्षात केली त्यामुळेच हा एकनाथ शिंदे आज सर्वांना आपला मुख्यमंत्री वाटू लागला आहे.लाडकी बहिणीचे पैसे खात्यात टाकल्यावर म्हणतात पैसे काढून घ्या नाहीतर सरकार पुन्हा काढून घेईल त्यांना मला हे सांगण आहे की 5 हप्ते दिले असून हे सरकार तुमच्यासारखे पैस काढुन घेणारं सरकार नव्हतं तर पैसे देणारं सरकार आहे आणि त्यामुळे आज ही लढा ही महाविकास आघाडी व महायुतीची नसून विकासाची आहे.विकास विरोधी लोकांची आणि विकासाच्या बाजुची खरी लढा आहे असे म्हणत मा.मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला.तुम्ही मला हलक्यात घेऊ नका,जर हलक्यात घेतलं तर ही '' दाडी महाविकास आघाडीची गाडी डॅमेज करेल '' असा विरोधकांना समजने वाले को इशाराच एक प्रकाराचा आपल्या मनोगतातून दिला आहे.यावेळी मा.मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो त्यामुळे आम्ही जो वचननामा जाहिर केल्याने "ये तो ट्रेलर है,पिक्चर अभी बाकी है" असे म्हणत आम्ही वचनपुर्ती असल्याचे यावेळी पुन्हा एकदा सांगितले आहे.

          '' किसन कथोरे तुम्ही निधी आणण्यात एक्सपर्ट आहात '' या मनोगताच्या शब्दसुमनाने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच टाळयांच्या गजरात मेळावा गाजविला आहे.हा एकनाथ शिंदे स्वतःला सी.एम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नसून सी.एम म्हणजे कॉमन मॅन समजतो,आता वामन म्हात्रे सुध्दा माझ्या सोबतच आहेत त्यामुळे जो काही विषय असेल ते आपण सोडवणार पण वामन म्हात्रे यांच्या केसाला सुध्दा धक्का लागू देणार नाही व कथोरे साहेबांच्या मागे मी आहे असे म्हणत एकजूटीची ताकद पुन्हा एकत्र असल्याचे मा.मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दाखवून देत किसन कथोरे यांना हेच पुन्हा आमदार असतील असे म्हणत श्री.कथोरे हे केवळ भाजपाचे उमेदवार नसून ते महायुतीचे उमेदवार आहेत असे म्हणत त्यांना आमदार बनविण्यासाठी सर्वांनी विजयाकडे नेण्यासाठी काम करावे असेही यावेळी सर्वांना संबोधित केले आहे.याच व्यासपिठावरून महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा खरपूस समाचार घेत तुम्हाला ज्यांनी मोठं केलं,तुम्हाला आम्ही सत्ता दिली,अधिकार दिले,तुमच्या हवाली जिल्हापरिषद केली पण एवढी बेमानी केली,परंतु एकनाथ शिंदेशी  केलेली बेमानी खपवून घेणार नाही,तुमची गाठ कथोरेंशी नाही तर माझ्याशी आहे,ज्यांना मोठं करतो त्यांचे सर्व सुत्रही आहेत असे म्हणत ठामपणे आमदार श्री.कथोरे यांच्या पाठिशी महायुतीचे सर्वच कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी स्वतःची निवडणूक आहे असे समजून काम करावे,ज्या ठिकाणाहुन लीड कमी आले तर त्यांना पुढील येणार्‍या निवडणूकीचे तिकीट दिले जाणार नसल्याचेही यावेळी व्यासपिठावरून जाहिरपणे सांगितले आहे.त्यामुळे आता अगळा वेगळा प्रश्‍नच आता सर्वांसमोर उभा राहिला असून मताधिक्याने हॅट्रीकची भरारी आमदार म्हणून किसन कथोरे यांच्या वाटेला येणार असल्याचे सर्व ठिकाणी बोलले जात आहे.यावेळी व्यासपिठावर महायुतीसह पाठिंबा देणारे विविध संघटनेचे सर्व प्रमुख मान्यवर यांच्यासह पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

 

Post a Comment

Previous Post Next Post