दि.29,विशेष प्रतिनिधी,मुरबाड -
शांतारामभाऊ कला विज्ञान आणि गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे येथील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे द्वितीय सत्र प्रशिक्षण कार्यक्रम दि. २४/१२/२०२४ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य एम ए बडगुजर हे होते. कार्यक्रमाला विभागाचे विभागीय समन्वयक प्राध्यापक सुनील नंबीयार सर हे प्रमुख मार्गदर्शक होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विभागाचे विद्यार्थिनी ललिता देसले हिच्या स्वागत गीताने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील DLLE प्रमुख व अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एल.आर. संते यांनी केले. त्यांनी यामध्ये विभागाकडून राबवल्या जाणाऱ्या सर्वे रिसर्च आणि करिअर प्रोजेक्ट या दोन ऍक्टिव्हिटी ची माहिती दिली. तसेच विभागाचा इतिहास,विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, कार्यक्रम यांचा आढावा घेतला. तसेच त्यांनी DLLE मुंबई विद्यापीठामार्फत राबवल्या जाणाऱ्या वार्षिक उडान फेस्टिवल विषयी माहिती दिली.
विभागाचे विभागीय समन्वयक नंबीयार सर यांनी विभागाचे काम कसे केले जाते व ऍक्टिव्हिटी कशा पूर्ण कराव्या याविषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी वार्षिक प्रकल्प कसा पूर्ण करावा याविषयी सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एम ए बडगुजर सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांनी या विभागाच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन उडान फेस्टिवल मध्ये यश संपादन करावे असे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये हा विभाग किती महत्वपूर्ण आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील १५९ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुतीका झुंजारराव यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्टुडन्ट मॅनेजर संतोषी हिंडे हिने केले.
Post a Comment