BIG BREAKING NEWS...

वीटभट्टी चालक मालकांवरी खोटे गुन्हे दाखल होतात त्यांच्यावरील होणारा अन्याय मी होऊ देणार नाही - आमदार किसनराव कथोरे

दि.10,POL,कुणाल शेलार,मुरबाड

महाराष्ट्रातील आमदारांपैकी श्री.कथोरे यांनी सन 2019 सालाच्या निवडणूकीत सर्वाधिक मते घेऊन 3 रे क्रमांकाचे स्थान मिळविले होते तसेच 2024 च्या निवडनूकीत पुन्हा बहुमताने निवडून येत सलग 5 व्यांदा विक्रम मिळविला आहे.आमदार श्री.कथोरे यांनी केलेला विकास आणि प्रत्येक समाजातील घटकांसाठी केलेले कार्य अनगिणत असून त्यांच्या कार्याच्या पाढाला पुर्णविराम अद्दयापही मिळाला नाही आणि तो कधीच मिळणार नाही असा विश्‍वास जनतेलाच असल्याने यंदाही जनतेने आमदार श्री.कथोरे यांना पुन्हा विधानसभवनात पाठविले आहे.

संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आहे आणि त्यावर मात करणं सर्वांनाच जमतं असे नसते परंतु ज्यांनी मात केली त्याला कोणतीही अदृश्य शक्ती हरवु शकत नाही अशीच लढत मुरबाड विधानसभेच्या निवडणूकीत होती परंतु आमदार श्री.कथोरे यांना हरविण्यासाठी अदृश्य शक्तीही कमकुवत पडली कारण श्री.कथोरे यांच्या मागे सर्वच घटकांतील जनसामान्यांचा विश्‍वास होता त्यापैकी एक अतुट विश्‍वास म्हणजे कोकण विभगीय विटभट्टी चालक मालक संघटना यांचा.संकट समयी सदैव पाठिशी उभे राहुन समस्यांची जान महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांना असल्याच्या भावना कोकण विभगीय विटभट्टी चालक मालक संघटना यांनी व्यक्त केले असून नुकताच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 मध्ये मुरबाड विधानसभेतून आमदार किसनराव कथोरे यांनी पुन्हा 52 हजाराच्या लीडने बाजी मारून पुन्हा आमदारकी पदी निवड झाल्याच्या आनंदाने कोकण विभगीय विटभट्टी चालक मालक संघटनेतर्फे मुरबाड येथील एमआयडीसी हॉल येथे सत्कार आमच्या समस्या सोडवणार्‍या आमदार साहेबांच्या या आशयेखाली आमदार श्री.कथोरे यांचे भव्य सत्कार करण्यात आले.

यावेळी आमदार श्री.कथोरे यांनीही आपल्या संभाषणात विटभट्टी चालक मालक यांच्या विविध समस्या,प्रश्‍नावर लक्ष केंद्रित करणार असून म्हसा यात्रे नंतर प्रशासनाबरोबर संघर्षाच्या अडचणीवर बैठक लावण्यात येणार असल्याचे म्हणत आज विद्दभट्टी चालक मालक व्यवसाय करित आहेत त्यांच्यावर काही खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात त्यावर महसूलमंत्री,आदिवासी विकास मंत्री,पोलिस प्रशासन यांच्याशी संवाद साधून एकदाच मार्ग काढून घेऊ असे म्हंटले.विटभट्टी चालक मालक यांच्या पाठीशी मी तेव्हाही होतो,आजही आहे आणि भविष्यातही राहणार मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असेही आपल्या संभाषणातून ग्वाही दिली त्याचबरोबर संघटनेच्या वतीने जो भव्य दिव्य सत्कार करण्यात आले त्याबद्दल आमदार श्री.कथोरे यांनी आभार मानले.

यावेळी व्यासपिठावर ठाणे जिल्हाध्यक्ष शंकर खारिक,जि.प.सदस्य उल्हासभाऊ बांगर,बंडू पाटील,नितीन मोहपे सर,सुरेश बांगर सर,जयवंत कराळे सर,अनिल घरत,अ‍ॅड.सचिन चौधरी,दिनेश उघडे, एकनाथ पोगेरे,समाजसेवक मनोज रमेश देसले,केशव देसले,संतोष पवार,संघटनेचे मुरबाड तालुकाक्यक्ष महेश देसले,जगदीश हिदुराव, अनंता आण्णा भोईर(घोरले),मार्तंड टेकडे,बाळा बोंबळे यांसह ठाणे पालघर व अन्य जिल्हयातील विटभट्टी मालक चालक यावेळी उपस्थित होते.या सत्कार समारंभाला प्रसिध्द गायक वैभव मंडलीक यांनी आपल्या आवाजातुन संगित गात सर्वांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ह.भ.प रमेशजी शिंदे यांनी केले.

 


Post a Comment

Previous Post Next Post