BIG BREAKING NEWS...

तारांगण शाळा संस्था शिरवली येथे अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने घेतले विशेष कार्यक्रम...

 

दि.05,POL,कुणाल शेलार,मुरबाड

मुरबाड तालुक्यातील शिरवली येथील तारांगण शाळा संस्था येथिल अपंग मुलांची निवासी शाळा असून या शाळेत 2 जानेवारी 2025 रोजी अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या वतीने विविध अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या विशेष कार्यक्रमात मुलांना विज्ञानाचे मॉडेल दाखवून मानवी शरीर,दृष्टिसरतात्य, व अन्या अशा वैज्ञानिक मॉडेल्स दाखवून त्यांना विज्ञानाचे ज्ञान देण्याचे महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.आज याच तारांगण शाळेत अपंग मुलं आहेत कि ज्यांना शिकण्याची आवड आहे त्यांच्या आवडीची बारकार्इने अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशनने जाणली अन एक दिवस आपल्या भावंडांसाठी म्हणून हा विशेष कार्यक्रमाची कार्यशाळा घेत शारिरीक दृष्टया जरी अपंग असले तरीही शिकण्याचे मनोबल त्यांच्यात वाढवण्याचे कार्य केले आहे.यावेळी संस्थेच्या कर्मचारी यांच्याबरोबर सर्वच आपल्या भावंडांनी या कार्यशाळेतुन मॉडेल्सच्या माध्यमातून शरीराच्या अवयवांची माहिती जाणून घेतली.अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशन नेहमी सर्वांच्याच सुख दुखःत सामील होत असल्याने अलीकडे जिथं खरी ज्ञानाची पाहोचायला हवी तिथंच ही संस्था जोमाने काम करतांना दिसत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशनचे कर्मचारी सौ.हर्षला चौधरी व एकनाथ विशे यांनी केले असून या कार्यक्रमाच्या माध्यामातुन माणूसकी झरी आजही जिवंत आहे असा संदेश समाजात पाहोचत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post