दि,28,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्याच्या झालेल्या सर्वच विकासाचा विचार केला तर महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांचेच नाव समोर येते.विकास करतांना आमदार श्री.कथोरे यांनी योग्य व्यक्तींची केलेली निवड विकासाचा मानबिंदू ठरला आहे.गाव खेडे पाडयातुन झपाटयाने झालेला विकास सार्थ अभिमान सांगून जात आहे.याच विकासनगरीत महिला म्हणून रणरागिनी जी माणूसकी झरीतून समाजाच्या प्रत्येक घटकात जाऊन जनसामान्य लोकांचा व त्यांच्या विविध प्रश्नांचा,अडीअडचणीचा विचार करून त्यांना मदत करून महिलांसाठी सक्षमीकरणाची सत्यतेची वाटचाल ठरू शकेल अशा सौ.स्वराताई सचिन चौधरी यांच्या पाठिशी सदैव एक वडिल म्हणून समाजशील कार्यशैलीची तालुका विकासाची जबाबदारी सोपविली आणि ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी एकनिष्ठेने कटिबध्द झाल्या अशा नामवंत असलेले वकिल अडॅ.सचिनभाऊ चौधरी यांच्या पत्नी सौ.स्वराताई सचिन चौधरी यांचा वाढदिवस कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सौ.स्वराताई सचिन चौधरी या मुरबाड पंचायतीचे माजी सभापती होत्या त्यांच्या कालावधीत गावखेडे पाडयात विकास होऊन जनतेच्या समस्या सोडवितांना त्यातूनच त्यांनी हजारो नागरिकांसह महिला भगिनींची मने जिंकून घेतली आहेत.कमी कालावधीतच कमविलेली ज्येष्ठ नागरिक,महिला,भाऊ,बहिणीं वाढदिवसाला उपस्थित राहून मोठया गर्दीने स्वराताईंची खरी माणूसकी झरी नैतिकता जपणारी सांगून गेली आहे.यावेळी प्रसिध्दी मराठी सिने अभिनेत्री लग्नाची बेडी सिंधू अर्थात सायली देवधर प्रमुख आकर्षण ठरली आहे.यावर्षीही मुरबाड तालुक्यातील तुळई येथे वाढदिवस अभिष्टन चिंतन सोहळयाचे औचित्य साधून महिलांकरिता लकी ड्रॉ राबविण्यात आले यावेळी कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्याशुभ हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आले विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आले.सौ.स्वराताई चौधरी यांनी चांगल्या विचारातून जनतेचे विश्वास संपादन केल्याने या वाढदिवसाला आमदार श्री.कथोरे यांनी सौ.स्वराताई सचिन चौधरी यांना शुभेच्छा देत महिला कॅन्सरमुक्त करण्याचा संकल्प करूया असे आपल्या संभाषणात म्हंटले आहे.
या वाढदिवसाला
शुभेच्छा देण्यासाठी भाजपाचे नेते भरत पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश
बांगर सर,नितीन मोहपे सर,मुरबाड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षा सौ.मानसीताई मनोज देसले,मा.सभापती
दिपक पवार,शिवसेनेचे संतोष विशे,अतुल देशमुख,नगरसेवक मोहन सासे,उद्दयोगपती सुभाष कडव,रविंद्र
पठारे,पत्रकार संजय बोरगे,दिलीप पवार यांच्यासह सर्वच मान्यवरांसह महिला भगिनी मोठया
संख्येने उपस्थित होत्या.
Post a Comment