BIG BREAKING NEWS...

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांचा पाहणी द्वौरा...

 

दि,28,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

ठाणे जिल्हयातील सर्वच ग्रामीण रूग्णालयात नागरिकांना सुसज्ज सुविधा उपलब्ध व्हावेत म्हणून सदैव ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांचे कार्य झळकत राहिले आहेत.ग्रामीण रूग्णालयात आज हजारो नागरिक दररोज उपचार घेण्याकरिता येत असतात त्यांच्या उपचाराकरिता वद्दयकिय अधिक्षक,डॉक्टर,अधिपरिचारिका,स्टार्फ कर्मचारी आपल्या कर्तव्यावर नागरिकांची सेवा करतांना दिसले आहेत.याच सेवेची नेहमी पाहणी त्याचबरोबर विकासकामे कशी सुरू आहेत याचा आढावा पाहणी द्वौरातुन घेण्यात येत असतो असाच पाहणी द्वौरा ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी मुरबाड ग्रामीण रूग्णालयात करून विशिष्ट स्वरूपाची माहिती जाणून घेतली.

आपली डॅशिंग जबाबदारी आणि माणूसकीची झरी जपणारे ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी लाखो नागरिकांची मने जिंकून घेतली आहेत.आज मुरबाड ग्रामीण रूग्णालय म्हणजे नागरिकांचे आधारवड झाले आहे.या रूग्णालयात सुसज्ज अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांचा सदैव पुढाकार राहिला आहे त्याचेच उदाहरण म्हणजे लवकरच हे ग्रामीण रूग्णालय उपजिल्हा रूग्णालय म्हणून ओळखले जाणार आहे.

त्याचबरोबर ग्रामीण रूग्णालय मुरबाडच्या पाहणी द्वौरादरम्यान ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी प्रत्येक विभागाला भेट देऊन येथील कोणत्या तांत्रिक अडचणी असतील ते जाणून घेऊन नव्याने सुरू झालेल्या डायलेसिस विभागाला भेट दिली.शासनावर नागरिकांचा विश्‍वास 100 पटीने वाढविण्यासाठी त्यांना सुविधा जलदगतीने मिळावेत यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे अशा सुचनाही कर्मचारी यांना दिल्या आहेत.

या भेटी दरम्यान ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी आपल्या ग्रामीण रूग्णालयात सुविधा कोणत्या उपलब्ध करता येतील त्यावर तात्काळ पुर्तता करण्यात येल अशी चर्चा मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षक तथा नेत्रशल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे यांच्याशी यावेळी केली आहे.

यावेळी ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा दंत सर्जन डॉ.मिसेस पवार मॅडम,आरबीएसके जिल्हा समन्वयक डॉ.जोशी सर यांचे सहर्ष स्वागत वैद्दयकिय अधिक्षक तथा नेत्रशल्यचिकित्सक डॉ.संग्राम डांगे,कार्यालयीन अधिक्षक श्री.माणीक गायकवाड,डॉ.स्वप्नील वाकचौरे,डॉ.अनिल पटेल यांनी केले असून या स्वागताला सर्वच डॉक्टर,अधिपरिचारिका,स्टाफ कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post