BIG BREAKING NEWS...

मुरबाड शहरात महास्वच्छता अभियान...

 

दि,05,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

महाराष्ट्र भूषण,थोर निरूपणकार डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा,ता.अलिबाग,जि.रायगड यांच्या सौजन्यांने स्वर्गीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्धी निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले असून मुरबाड शहरातही मोठया उत्साहाने श्रीसदस्य यांनी या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शहराची साफसफा करून शहर चकाचक केले.

यावेळी सर्व श्रीसदस्य यांनी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती पटांगणात येऊन तेथून गटाप्रमाणे ठरविलेल्या शहरातील वार्डात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.शहरातील ग्रामीण रूग्णालयासह पंचायत समिती,तहसिल कार्यालय,शास्त्रीनगर तलाव तसेच कुणबी भवन,मुख्य बाजारपेठ यांसह अन्य प्रभागात एकूण 1727 श्रीसदस्यांनी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शहर चमकविले.या अभियाना मुरबाड नगरपंचायतीचे अधिकारीवर्गांसह कर्मचारी वर्गांनी सहभाग नोंदवून घंटागाडयांची मदत केली.साफसफा करून संकलित कचरा टॅ्रक्टर व पिकअपच्या माध्यमातून शहराबाहेर नेण्यात आले.

मुरबाड ग्रामीण रूग्णालयात श्रीसदस्यांनी केवळ 2 तासाच्या आतच स्वच्छता अभियानातून रूग्णालय चमकविले.यावेळी या महास्वच्छता अभियानात मुरबाड नगरपंचायतीचे शहराध्यक्ष संतोष(बाबु)चौधरी,माजी नगराध्यक्ष तथा आरोग्य विभाग सभापती रामभाऊ दुधाळे,उपनगराध्यक्षा सौ.मानसीता मनोज देसले,समाजसेवक मनोज रमेश देसले,माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे,माजी नगराध्यक्ष मुकेश विशे, श्री.पाटोळे,पत्रकार दिलीप पवार,तानाजी भोर,यांसह मोठया संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते.यावेळी ग्रामीण रूग्णालय मुरबाडचे नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी यावेळी श्रीसदस्यांना मास्क व हँडग्लोज तसेच लागणार्‍या अत्यावश्यक वस्तुची व्यवस्था करून दिली त्याचबरोबर श्रीसदस्यांना चहा,बिस्कीटे,पाण्याची व्यवस्थाही यावेळी करण्यात आली होती.

 

Post a Comment

Previous Post Next Post