BIG BREAKING NEWS...

कु.चंदना विजय कापडी हिने मारली 12 वी परिक्षेत बाजी...

 

दि,08,POL, कुणाल शेलार,मुरबाड –

मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावातील विजय पांडुरंग कापडी यांची कन्या कु.चंदना विजय कापडी हिने 12 वी परिक्षेत फस्ट क्लास म्हणून 60 टक्के मार्कानी बाजी मारली आहे.मुरबाड येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये कु.चंदना कापडी हिने कॉमर्स मध्ये प्रवेश घेतला असता प्राचार्य श्री.पाडवी सर तसेच शिक्षकांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने तिने यश संपादन केल्याचे आमच्याशी बोलतांना तिने म्हंटले आहे.घराची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत त्यातच वडिलांना लकवेचा आजार असताना शेतकर्‍याच्या मुलीने परिश्रम घेत मेहनत केली अन तिने गरूड झेप घेत जिद्दीने त्याचबरोबर पराकष्टाने हे यश मिळविले.नेहमी देशहिताचे विचार मनात ठेवून सिमेवर जाण्यासाठी तिचे स्वप्न एक सैनिक म्हणून राहिले असून या यशाने तिचे स्वप्न नक्कीच साकार करेल यात शंका नाही.कु.चंदना कापडी हि 12 वी परिक्षेत उत्तीर्ण म्हणून पास झाल्याने तिचे कुटूंबाकडून तसेच गाव,तालुका पातळीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post