BIG BREAKING NEWS...

मुरबाड तालुक्यातील 126 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर

 

दि,14,POL, कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड तालुक्यातील 126 ग्रामपंचायतीचे वर्ष 2025 ते 2030 या कालावधीतील सरपंच आरक्षण सोडत दि.12/05/2025 रोजी मुरबाड तहसिलदार यांचेमार्फत  आरक्षण सोडत शुध्दीपत्रक जाहीर करण्यात आले होते त्यानुसार दि.13/05/2025 रोजी सकाळी ठिक 11 वाजता एम.आय.डी.सी.हॉल मुरबाड येथे ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सरपंच आरक्षण पदाची सोडत पार पडली.यामध्ये तालुक्यातील 126 ग्रामपंचायतीचा समावेश असून महिला आरक्षण,बिगर अनुसूचित क्षेत्रातील सरपंच आरक्षण सोडतीत अनु.जातीमध्ये प्रवर्ग व महिला असे 2 ग्रामपंचायती,अनु.जमाती मध्ये 4 ग्रामपंचायती,ना.मा.प्र मध्ये 19 ग्रामपंचायती,सर्वसाधारण मध्ये 46 ग्रामपंचायती तर पेसा अंतर्गत असलेल्या एकूण अनुसूचित क्षेत्रातील सरपंच महिला आरक्षणामध्ये 28 ग्रामपंचायती तसेच अनुसूचित क्षेत्रातील सर्वसाधारण सरपंच आरक्षितमध्ये 27 ग्रामपंचायतींचा समावेश जाहिर झालेल्या आरक्षण सोडत करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले आहे.सदर सोडत लहान मुलाच्या हातून काढण्यात आली आहे.यावेळी उपविभागीय अधिकारी ठाणे उर्मिला पाटील,मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख,गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड यांच्या समक्ष  उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.यापवेळी मुरबाड तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,सदस्य, नागरिक तसेच पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post