दि.31-कुणाल शेलार,POL, मुरबाड -
मुरबाड तालुक्यातील शिवळे येथील विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिवळे शाळेत सेमी मधील विद्यार्थ्यांनी मध्यस्थी सेमी वर्गाची सहाशे रुपये इतकी फी भरली परंतु मूळ विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शिवळे यांची पावती न देता जनसेवा शिक्षण मंडळ मुरबाड अशी एकूण 600/- रुपयाची पावती देऊन विकास/इमारत निधी नमूद असून हस्तलिखित सेमी फी सदर फी कोणासाठी विकास/इमारत निधीसाठी की स्वतःच्या शिक्षणासाठी असा प्रश्न उभा राहत आहे. सन 22/10/2024 ची पावती ही मूळ विद्यामंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची असून सत्र म्हणून 300 रुपयाची पावती देण्यात आली,परंतु कालांतराने नेमकं काय बदल झाला ते कळून येत नसून सन 24/01/2025 च्या पावतीमध्ये विकास/इमारत निधी अशा आशयाची 600 रुपयाची पावती विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने नेमकं हा काय घोळ आहे हे कळून येत नसून पालक वर्ग संभ्रमात पडले आहे.
Post a Comment