दि,01,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मार्च एंडिंग झाली असून
काही जण पाकीटाच्या प्रतिक्षेत असुन अधिकारी वर्ग जागेवर सापडत नसल्याची कानखुना कळून
येत आहेत.नेमकी पाकीट कोणतं याचं गणित सुटेनासं झालं आहे.भ्रष्टाचारांना पाठिशी घालणारे
यांनी मुठभर पाकीटवाले बांधून घेतले असून त्यांच्या पाकीटावर नाव टाकण्याची यादी देखील
तयार केली असेल असे नाकारता येणार नाही.मग हा पाकीट कोणता असा प्रश्न उभा राहत आहे.मार्च
एंडिंग ही सर्वांचीच एंडिंग आहे परंतु ठेकेदाराकडून कि अधिकारी यांच्याकडून मिळते हे
गणित सुटेनासे झाल्याचे एका व्यक्तीने आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.त्यामुळे अधिकारी
महोदय आम्हालाही त्या पाकिटाची माहिती देऊन काय ते निष्पण कराल असा आमचा प्रश्न आहे.वर्षाअखेर
मार्च महिना अतिशय कठिणाइचा जात असून यामध्ये पैसे काढून घेण्याचा मनसूबी प्रकार सर्वांना
माहित आहे़जी कामं केली नाहीत त्यांचंही बिलं काढून खाल्ले जात आहे.कधी झेंडयात भ्रष्टाचार
केला जातो तर कधी इतर कामात कामं अर्धवट असताना बिलं काढून मार्च एंडिंग केली जाते,वरिष्ठ
अधिकारी हे पारदर्शक काम करतात परंतु खालचे मात्र अपुर्णत्वाला पुर्णत्वाचे दाखले देऊन
बिलं काढून मोकळी होतात असे जानकराचे मत असुन ठेकेदाराला विलाखा घालुन संगनमताने दो
तुम्हारे 2 हमारे अशा पध्दतीने भ्रष्टाचार करतात आणि याच भ्रष्टाचाराची कानकुनी दुसर्याला
समजताच त्यांना मार्च एंडिंगचा पाकीट गिफ्ट म्हणून देण्यात येतो हा गलथान व भ्रष्टाचारी
कारभार थांबावं म्हणून साहेब आपण याकडेही लक्ष घालावं अशी मागणी समोर येत आहे.
Post a Comment