BIG BREAKING NEWS...

" साहेब लक्ष घाला '' अन ठेकेदारानं कामात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावा....

 

दि,01,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड तालुक्यात शेकडो ठेकेदार आहोत ज्यांच्यावर साहेब आपण विश्‍वास दर्शविला आहे.आपले मुलमंत्र म्हणजे कामं करा तेही निकृष्ट दर्जाची नको परंतु अधिकारी यांच्याशी संगणमत करून निकृष्ट दर्जाची कामं करण्यात येथील ठेकेदार जो समर्थक सांगून करोडो रूपयाची कामं करतोय त्या कामात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आहे यामुळे साहेब आपले नावाखाली मनमानी कारभार केला जात असल्याची चर्चा आहे अशा ठेकेदारांवर आपला चोखपणे जबरी आवाज त्यांच्या कानावर पाहोचून त्यांनी केलेल्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.ज्यांनी आपणांस स्वार्थापोती साथ दिली तीच आज ठेकेदारीच्या माध्यमातून आपल्या नावाची बदनामी करण्याची मनसुबी प्रकार करित असल्याची शक्यता नाकाराता येत नसून अशा ठेकेदारांवर आपले वचक असणं गरजेचं आहे.कोण काय लिहतो व त्याचे नेहमी ठेकेदाराच्या कामावर का लक्ष आहे त्याचे कारण साहेब आपणांस बदनाम करण्याचा मनसुबी प्रकार असू शकतो परंतु अधिकारी यांना लागलेली टक्केवारीच चटक यावरही आपण लक्ष वेधल्यावर निकृष्ट कामे होणं जमणार नाही.आपण एक प्रभावी साहेब ठरलात खालची परिस्थिती आपल्या डोळयाखालून जात नसल्याने येथील ठेकेदार बादशहा समजू लागल्याने हम करे सो कायदा या आशयाखाली भ्रष्टाचाराचा मानकरी झाला आहे त्यामुळे ठेकेदारानं केलेल्या कामात भ्रष्टाचारावर पांघरून न घालता अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश तसेच सुचना दिल्यास हा भ्रष्टाचार आपल्याच माध्यमातून रोखता येर्इल.प्रत्येक कामाता ठेकेदाराला टक्केवारीचा सामना करावा लागत असल्याने अधिकारी वर्गाशी नाळ जुळवून घेण्यासाठी आणि कमार्इचं साधन मिळविण्यासाठी ठेकेदार आज उच्च लिमिटेडमध्ये जगत आहे.कोणाच्या कामात कोणी पडत नाही परंतु एखादा नवीन ठेकेदार जन्माला आला की टेंडर भरून त्याला खाऊन टाकण्याचा कारनामा केला जात आहे.साहेब आपण जनसामान्यांचे कैवारी आहाता परंतु ठराविक ठेकेदार यांची वाढती मनमानी विकासकामाला गती देत नसल्याने विकासावर बोट ठेवण्याचा अनेक जण बोटं ठेवत आहेत त्यामुळे ठेकेदारासह अधिकारी वर्गाला तंबी देणं काळाची गरज ठरेल असे मला वाटत असून अधिकरी वर्गाची टक्केवारी प्रथम बंद करावी अशी अपेक्षा नागरिकांच्या माध्यमातून असून विकासाला गती मिळावी व भ्रष्टाचार थांबावा अशीच इच्छा येथील जनसामान्यांची आहे.आम्ही लिहतो ते वात्सव्यावतून व अनुभवातून लिहतो आणि जे लिहतो ते साहेब आपल्यापर्यंत या माध्यमातून पाहोचविणे आमचं कर्तव्य समजतो त्यामुळे ठेकेदारांच्या चुकीला माफी देऊ नका हीच विनवणी आपल्याला या माध्यमातून करित आहोत.

 

Post a Comment

Previous Post Next Post