BIG BREAKING NEWS...

आम्ही भ्रष्टाचार केले हे सिध्द करून दाखविल्यास नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ व राजकारणाचा सन्यांस घेऊ - मनोज देसले

 

दि,16,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाड नगरपंचायतीमध्ये आरोप प्रत्यारोपाची स्पर्धा सुरू असून यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुरबाड नगरपंचायतीमधील प्रभाग क्र.2 व प्रभाग क्र.15 मध्ये सर्वाधिक निधी,भ्रष्टाचार तसेच उपनगराध्यक्ष पद देण्याच्या प्रामुखिक मुद्दयावर आणि नगरसेवकांची नाराजी असलेली पत्रकार परिषद घेण्यात आली होती.यामध्ये मुरबाड नगरपंचायतीचे नगरसेवक राम दुधाळे यांनी विविध स्वरूपाचे मुद्दे मांडून आरोप करून आमदार किसन कथोरे यांच्या टिकेला उत्तर दिले.त्यानंतर टिडीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांनी त्या टिकेला खुलासा करून देणारी पहिलीच पत्रकार परिषद घेऊन सडकून राम दुधाळे यांचा समाचार घेत आरोपाचं खंडण केलं.त्यानंतर प्रभाग क्र.15 च्या नगरसेविका माधुरी मोहन सासे व मा.नगराध्यक्ष मोहन सासे यांनी देखील पत्रकार परिषेद घेऊन आरोपाचं खंडण करून एकनिष्ठेचे जणू वाभाडेच काढले.काल प्रभाग क्र.2 मध्ये नगरसेविका मानसी मनोज देसले,मनोज देसले यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडले.यामध्ये मनोज देसले यांनी राम दुधाळे यांच्या प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तर देत केलेल्या आरोपाचं खंडण करून प्रत्येक राजकीय वरिष्ठ नेत्यावर टिका करतांना भान ठेवलं पाहिजे असे सुचितच केले.माझ्या वडिलांनी निष्ठेने पक्षात काम केले आणि आम्हीही एकनिष्ठेने पक्षासोबत आणि आमदार किसन कथोरे साहेबांसोबतच आहोत त्यामुळे आम्ही गद्दार नसल्याचा टोलाही यावेळी विरोधात्मक भूमिका घेणार्‍यांना लगावला.गेलेले नगरसेवक यांचे कधी कथोरे साहेबांच्या निर्णयाला विरोध नव्हता त्यांच्या कानात विष भरल्याचेही यावेळी मनोज देसले यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना सांगितले.तसेच वैयक्तीक स्वार्थासाठी कथोरे साहेबांवर केलेली टिका ही खालच्या दर्जाची असून आम्ही आमची पातळी सांभाळली असून कधीही आदरणीय वरिष्ठ नेते यांच्यावर कोणतीही टिका टिपण्णी केलेली नाही,आमच्या प्रभागात जास्त निधी दिला,भ्रष्टाचार झाला असे आरोप करण्यात आले असून हा प्रभाग भौगोलिकदृष्टया मोठा असून आम्ही केलेला विकास त्यांनी बघावा इथं विकासाबरोबर माणसांची सेवा केली आहे आणि आम्ही भ्रष्टाचार केले हे सिध्द करून दाखविल्यास नगसरेवक पदाचा राजीनामा देऊ व राजकारणाचा सन्यांस घेऊ असे आवाहनही थेट इशारासह मनोज देसले यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.विरोधात्मक भुमिकेतील असणार्‍यांनी निधी जास्त यांनाच असल्याचे आरोप केले त्यावर आम्ही आणलेला निधी हा बौध्दिक कौशल्यावर,कथोरे साहेबांच्या निष्ठेने आणि अधिकारी वर्गांशी चांगले संबंध ठेवले म्हणून आणून विकास करू शकलो,निधी आणू शकलो ते त्यांच्या पोटात पोटदुखी ठरली.भ्रष्टाचार जर केला असता तर माझ्या संपत्तीत वाढ झाली असती,जी संपत्ती आहे ती वडीलोपर्जित आहे त्यामुळेच मी पञ्याच्या घरात राहतो आणि ते 2 मजली बंगल्यात असा जोरदार उत्तरेने केलेल्या आरोपाचं खंडण केले आहे.त्याचबरोबर मुरबाड तहसिलदार कार्यालय बाहेर नेऊन व्यापारांचा धंदा मार्केट कमी झाला आणि जिथं मत कमी तिथं निधी जास्त या पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्‍नावर मनोज देसले यांनी उत्तर देत असे म्हंटले की,खर्‍या अर्थाने आमदार साहेबांनी प्रयत्न करून आणि लक्ष वेधून मुरबाड शहराचा कायापालट केले व प्रशासकीय इमारती उभ्या झाल्या,मुरबाड बाजारपेठेचा रस्ता अतिशय अरूंद असल्याने तहसिह कार्यालयात येणार्‍यांच्या गाडयामुळे ट्रॅफिक व गर्दी होऊ नये या उद्देशाने मुरबाड शहराच्या लगतच आहे ती 2 किमी अंतरावर नाही,माझे सहकारी नगरसेवक रामभाऊ दुधाळे यांनी आरोप केले व्यापारी वर्गाचा नुकसान केला,मग या आधीचे टपरीधारक गाळे होते त्या टपरींचे गाळयांत रूपांतर केलं,आणि ते गाळे बांधल्यानंतर हे गाळे अनधिकृत आहेत ते तोडावे हे आधी प्रयत्न करणारा माझाच सहकारी होता त्यावर प्रथम त्यांनी उत्तर द्दयावं कि मी का माझ्या व्यापार्‍यांवर पत्रव्यवहार केला? मत कमी तिथं निधी जास्त या दुसर्‍या प्रश्‍नावर त्यांनी पहिले राजकारण करतांना कागदावरचा अभ्यास करायचा असतो,आमच्या प्रभाग क्र.2मध्ये काम करित असताना माझ्या वार्डामध्ये तर इतर उमेदवार होते त्यांच बुथच लागले नाही,त्यामुळे आमच्या वार्डात कमी मत पडायचे विषयच राहत नाही,परंतु ज्यानी आरोप केले त्यांनी कथोरे साहेबांचा बुथ लावला होता का ? आणि ते ज्या प्रभागाचे नेतृत्व करतात शास्त्रीनगर,माळीपाडा,गोर्‍याचापाडा या बुथमध्ये बुथ क्रमांक 326,327 या बुथला 100 ते सव्वाशे मतांची पिछाडी होती आणि आम्ही ज्या प्रभागामध्ये नेतृत्व करतोय तिथं बुथ क्र.310,311,312 आणि 313 या बुथमध्ये कथोरे साहेबांना 1514 मत मिळाली विरोधी उमेदवार यांना 770 मतं मिळाली.मग 100 मतांची आघाडी आणि 100 मतांची पिछाडी हे आमच्या प्रभागात आहे कि आरोप करणारे आमचे सहकारी नगरसेवक यांच्या प्रभागात.म्हणून त्यांनी परिपूर्ण कागदावरचा अभ्यास केला पाहिजे मग मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष होण्याची स्वप्न पाहिली पाहिजे,मुरबाड शहर गुणी व जानकारांच शहर असून हे अशा भूलथापांना बळी पडणार नाही,जी सत्ता आणू पाहत असतील ती पॅनेल सत्ता जनतेतून नाही तर चोरून आणलेली असेल,आणि नेतृत्व करतांना आपण मुरबाडच्या जनतेला किती खरं अन किती खोटा सांगतोय याचा विचार त्यांनी केला पाहिजे अशा सडेतोड उत्तरांनी आरोपाचं खंडण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनोज देसले यांनी केलं आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post