दि,14,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड नगरपंचायतीमध्ये
काही दिवसांपूर्वी 12 नगरसेवकांनी मुरबाड परिवर्तन पॅनेल निर्माण तयार करून आपण ही
भूमिका का घेतली यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आमदार किसन कथोरे यांच्या टिकेला प्रतिउत्तर
दिले यावर अनेक विषय यावेळी मांडले त्यावर प्रभाग क्र.2 व प्रभाग क्र.15 मध्ये जादा
निधी देण्याचा मुद्दाही यावेळी मांडून मुरबाड नगरपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचेही
या पत्रकार परिषदेतुन मांडले या पत्रकार परिषदेत जे काही आरोप प्रत्यारोप करण्यात आले
त्यावर आज प्रभाग क्र.15 च्या नगरसेविका यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपाच
खंडण केले आहे.राम दुधाळे यांनी आमच्यावर अन्याय केले असल्याचा आरोप आमदार किसन कथोरे
साहेबांवर केला होता परंतु आमदार साहेबांनी कधीही कोणत्या नगरसेवकांचा अपमान किंवा
त्यांना तुच्छतेने वागवणूक दिली असे मी कधीही पाहिली नाही त्याची साक्षीदार मी स्वतः
आहे याउलट त्यांनी सर्वांनी एकत्र कसे राहिलं पाहिजे याविषयी त्यांच सतत वक्तव्य असायचं,त्यांच
सहानुभूतीपुरक विकासाच्या दूष्टिकोणातून मार्गदर्शन असायचं जेणे करून आपल्या मुरबाड
शहराची प्रगती मोठया स्थरावर नेता येईल आणि मुरबाड नगरपंचायतीचे नाव कसे झळकेल,नाविण्य
विकासकामे कसे होतील याकडे आमदार साहेबांनी सदैव बारकाईने लक्ष वेधून घेतले आहे.आमच्यावर
टिका करणारे हे ध्यान्यात घ्यावं की आम्ही जनतेच्या मनात मोठेच आहोत,कालपर्यंत आम्ही
एकत्र होतो त्यामुळे मला कधी अशी जाणीव झाली नाही की हे वेगळे होतील,पत्रकार परिषद
घेऊन टिका करणारे कालचे माजी नगराध्यक्ष व आत्ताचे बंडखोर हे नगराध्यक्ष असताना शिवसेना
शिंदे गटाच्या उमेदवारांची कामे आम्ही घेत होतो असा अजेंठा असल्याचे म्हणत होते मग
आमदार साहेबांनी युती धर्म पाळत असताना उपनगराध्यक्ष पद शिवसेना शिंदे गटाला देण्यावरून
त्यांनी माघार का घेतली ? भाजप पक्षातून हकालपट्टी केलेल्या बंडखोर लालची नगरसेवकाने
आमदार किसन कथोरे यांना पक्षनिष्ठा सांगू नये,कुडवलीला नेऊन ऐकालाच पोसण्याची भाषा
त्यांनी करू नये असे जोरदार सडेतोड उत्तर या पत्रकार परिषदेतून प्रभाग क्र.15 च्या
नगरसेविका सौ.मधुरा मोहन सासे यांनी दिला आहे.
अगोदरच हा गट स्थापण करण्याचं
षडयंत्र रचला होता परंतु युती धर्म असल्या कारणाने पुढच्या वेळी उपनगराध्यक्ष पद पुढील
वेळी शिवसेना(शिंदे गटाचे) नगरसेवक आहेत त्यांना देऊ असा आमदार साहेबांनी शब्द दिला
होता.आमदार किसन कथोरे हे नेहमी दिलेला शब्द आणि युती धर्म पाळतात ते यांना पटला नाही.यामध्ये
सर्वजण एक होते साहेब जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचे त्यावेळी मान्य केलेही
होते परंतु कालांतराने कधी वाटले नव्हते की इतकी मोठी गद्दारी होईल त्याचबरोबर गद्दारी
यांच्या नसानसात आहे आमच्या रक्तात नाही,त्यांच्यावर विश्वास साहेबांनी ठेवला परंतु
ते गद्दार निघाले,मुरबाड शहर तालुका सुज्ञ असून येथे कधीच जातीमय राजकारण झालेले नसून
ज्यानी पत्रकार परिषद घेऊन टिका केली तो कधीच एका जागी स्थिर नसून 3 ठिकाणाहून फिरून
आला आहे त्यामुळे "राम" निष्ठेने कोणाचाच झाला नाही आणि जनता लवकरच यांना
त्यांची जागा दाखवून देईल असे आजची घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मोहन सासे यांनी
केलेल्या आरोपांचा खंडण करून विरोधकात्मक भूमिका घेणार्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले
आहे.जे साहेबांच्या विरोधात आहेत त्यांना साहेबांनी पक्षाचे तिकीट दिले म्हणूनच हे
निवडून आले नाहीतर हे आलेच नसते कारण यांना आमदार किसन कथोरे यांचं नेतृत्व मान्य होते.मुरबाड
शहरातील झालेला विकास हा आमदार किसन कथोरे यांनी केलेला आहे त्यामुळे सुज्ञ जनतेला
या गोष्टी दिसत असून त्यांनी देखील 5 वेळा आमदार म्हणून किसन कथोरे यांनाच बहुमताने
निवडून आणून दाखविले आहे.मुरबाड शहरातील रस्ते,गटारे,स्ट्रीट लाईट,गार्डन,डंपिंग
ग्राऊंड,पाणी पुरवठा तसेच भाग दोन चे ही काम मंजूर होऊन त्याचही टेंडर झाले आहे परंतु
महाशयाने त्यामध्ये टेंडर टाकण्याचा प्रयत्न केला असून हा टेंडर हवा होता बाकी काही
नसल्याच्या प्रतिक्रियाही मोहन सासे यांनी यावेळी पत्रकार परिषदेतुन दिली आहे.भाजपातून
बाहेर जे गेलेत त्यांच्यावर काय कारवाई होऊ शकेल का अशा पत्रकारांच्या प्रश्नावर
लवकरच पक्ष श्रेष्ठी यावर विचार करतील तसेच माझ्या संपर्कात गेलेले नगरसेवक आहेत,काही
गोष्टी गोपनिय व गुलदस्त्यात असल्याचेही यावेळी श्री.सासे यांनी पत्रकारांशी बोलतांना
सांगितले आहे.
Post a Comment