BIG BREAKING NEWS...

जेव्हा माझा चष्मा खाली जातो तेव्हा भल्या भल्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो - आमदार किसन कथोरे

 

दि,08,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

मुरबाडमध्ये भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका व मुरबाड शहर संघटन पर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या बैठकीला महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठक कार्यक्रमाला आमदार श्री.कथोरे यांनी मुरबाड तालुक्यात होणार्‍या विकास कामांवर चर्चा करून मुरबाड तालुक्यातील पोटगाव येथे शंभर बेडच्या हॉस्पिटलसह मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली असल्याने ही बाब तालुक्याच्या इतिहासात नोंद होणारी ठरणार आहे.या घोषणेमुळे वैद्दयकीय शिक्षण क्षेत्रात भटकंती करणार्‍या विद्दयार्थ्यांना ही आनंदाची बाब असून माळशेज घाटातील काचेचा स्कायवॉक दृष्टिक्षेपात आल्याने याबाबत अर्थसंकल्पात मुरबाडसाठी पहिल्यांदाच तरतूद करण्यात आली असल्याचेही आमदार श्री.कथोरे यांनी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना सांगितले आहे.त्याचबरोबर मुरबाड नगरपंचायतीमध्ये काही दिवसांपूर्वी नुकत्याच पार पडलेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत ज्या नगरसेवकांनी पक्षाशी बेमानी करून गद्दारी केली त्यांना योग्यवेळी धडा शिकवणार असल्याचा इशाराच आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे.जेव्हा माझा चष्मा खाली जातो तेव्हा भल्या भल्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे ज्यांनी गद्दारी केली त्यांचा हिशोब चुकता करेन अशा कडक शब्दात फुटीर नगरसेवकांना आमदार श्री.कथोरे यांनी फटकारले आहे.ज्यांची लायकी नव्हती त्यांना मोठ मोठी पद दिली त्यांनी जाण मात्र ठेवली नाही त्यामुळे आता जो निष्ठेने पक्षाचे काम करेल त्याला न्याय नक्कीच मिळेल.मुरबाड नगरपंचातीतील 17 प्रभागांची तयारी सुरू झाली असून फुटलेल्या नगरसेवकांचा पुढील निवडणूकीत करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले त्यामुळे आमदार किसन कथोरे यांच्याशी आपण गद्दारी करून खरच चूकी केली की काय? असा विचार ते करित असल्याने मागील एका कवितेत नव्या चेहर्‍यांना संधी मिळेल का असा प्रश्‍न विचारण्यात आला असता यावर आमदार श्री.कथोरे यांनी त्या कवितेला तमाम कार्यकर्ते यांच्या समोर नव्या चेहर्‍यांना येत्या मुरबाड नगरपंचायत निवडणूकीत संधी मिळणार असल्याचे उत्तर जाहिर केल्याने ते नवे चेहरे कोणते हे लवकरच समोर येणार आहे.या कार्यकर्ता मेळावा बैठकीला नितीन मोहपे सर,दिपक पवार,अनिल घरत,मोहन सासे,अ‍ॅड.सचिनदादा चौधरी,सुधिरभा तेलवणे,मुकेश विशे,संतोष पवार,दिनेश उघडे,रविंद्र देसले,जगन माळी,स्वराता सचिन चौधरी,ज्योतीता गोडांबे,मानसीता मनोज देसले,समाजसेवक मनोज देसले यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post