BIG BREAKING NEWS...

झाकली मुठ लाखाची अन खोलली तर खाकाची ; करेक्ट कार्यक्रमाची सुरूवात झाली...

 

दि,17,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

कालपर्यंत आपलेच आहेत चुका तर माणसांकडून होतात या छत्र सावलीखाली सांभाळून घेतले परंतु त्यांनीच नंतर विरोधात्मक भूमिका घेतली अन सर्वत्र एकच आवाज गुंजु लागला की ते गद्दार निघाले.झाकलेली मुठ लाखाची होती परंतु ती आज खोलली असल्याने तीचे खाक होण्याची सुरूवात करेक्ट कार्यक्रमाच्या या एका शब्दातून दिसत आहे.ज्यांचा उध्दार झाला,यांना प्रेम दिलं त्यांनी साथ सोडल्यावर चौकशीचा सुर उमटल्याने अखेर डोक्यावरील छत्रसावलीचा हात बाजुला गेल्याने ज्यांचा त्यांचा बाजार उठायला सुरूवात झाले असल्याचे जनमानसांत बोलले जात आहे.समुद्राची लहर जाणली नसल्याने जिथं तिथं करेक्ट कार्यक्रमाची कहर पाहायला मिळत आहे.आमदार किसन कथोरे यांनी कालच अधिवेशन गाजवत वाल्हिवरे येथील आश्रम शाळेच्या संदर्भात अनेक मुद्दे मांडून प्रशासक बसविण्याची आक्रमक भूमिका घेतली त्यासंदर्भात 3 महिण्याकरिता प्रशासक नेमून सखोल चौकशी करण्याचे संबंधित मंत्री महोदयांनी सांगितले त्यातच मुरबाड विधानसभेतच्या विकासाकरिता निधीची उपलब्धता मिळवून देण्यासाठी आमदार किसन कथोरे यांचे प्रयत्नांना हिरवा कंदील मिळाला आहे.आमदार श्री.कथोरे यांचा चष्मा जेव्हा खाली जातो तेव्हा सामनेवाल्यांना वाली उरत नाही अशी चर्चा नाक्यानाक्यावर होतांना दिसली असून किंगमेकर असलेले कार्यसम्राट आमदार श्री.कथोरे यांचा जलवा प्रत्येक निवडणूकीतून जनतेसह तमाम महाराष्ट्राने अगदी जवळून पाहिले आहे.त्यांच्या कार्याची वेगळीच फळी जी त्यांनी स्वतः निर्माण केली आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना अनेक वेळा आधारस्तंभ असे संबोधीत केले आहे.जन्म घेऊन सोन्याचा चमचा नाही आणला तर हे वैभव जनतेच्या लोककल्याणासाठी स्वतः पराकष्टाने निर्माण केले आहे.बदलते शहर आणि केलेला विकास पुढील 100 वर्षे आमदार किसन कथोरे यांच्या नावाची साक्ष देणारा ठरणार यात शंका नसून काही गद्दारांना जी गद्दारी केली त्यांना माझ्याकडे आणू नका नाहीतर तुम्ही प्रथम माझ्या नजरेत गद्दार असाल हा शब्द आजही सर्वांच्या ध्यान्यात आहे.भलेभले नडले आणि पडले,इतकी शक्ती आमदार श्री.कथोरे यांच्याकडे असल्याने त्यांना उगाचच कार्यसम्राट म्हणत नाही.त्यांनी ठरवले तर एका रात्रीच खेळ पलटले जातील,पुढील 15 महिणे आहेत नगरपंचायतीला आणि इतका अवधी असल्याने काय कायापालट होल याची धास्ती आणि याबाबत चर्चा आता ऐकायला येत आहे.त्यामुळे न बोलता चष्मा खाली करून करेक्ट कार्यक्रमाची सुरूवात लागलेल्या चौकशीतून झाली आहे हे अनेकांना माहिती असून ते नाकारता येणार नाही.'' ये तो झाकी है,अभी बहोत कुछ बाकी है '' या इशाराने आमदर श्री.कथोरे यांच्याशी गद्दारी करणार्‍यांचं पुढे काय होणार,झाकली मुठ लाखाची अन खोलली तर खाकाची अशी म्हण कोणाच्या परडयात पडेल याकडे आता तमाम जनतेचं लक्ष लागून आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post