दि,02,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड शहरात मुरबाड नगरपंचायतीने
प्लॅस्टिक पिशव्या बंदी असल्याने गेल्या अनेक वर्षापासून झोपी गेलेली नगरपंचायतीला
एैन सणासुधी जाग आली आहे.अचानक झोपेतून प्रशासन जागे होताच प्लॅस्टिक पिशव्या विक्री
डिलरवर कारवाई न करता चक्क त्यांनी छोटे दुकानदारांवर दंड वसुली कारवाईला टार्गेट
केले आहे.नियमाचा आधार घेऊन दंडात्मक भूमिका बजावल्याने व्यवसायकांनी तीव्र नाराजी
व्यक्त केली आहे.अलीकडे हम करे सो कायदा म्हणून जुन्या कायदयाच्या आधारे कित्येक महिण्यातून
मुरबाड नगरपंचायतीने हस्तक्षेप करून लहान दुकानदारांना दंड मारण्याचा कारनामा प्रकार
हाती घेतला आहे.दिवसभरात दोनशे पाचशे कमविणारे व्यवसायकांवर धाडसत्र सुरू केले असून
मोठे व्यवसायकांवर किती कारवाई झाल्यात यावर अनेक जण प्रश्न विचारत आहेत.जमा होणारा
कष्टाचा पैसा एका प्लॅस्टिक पिशव्याच्या बंदीच्या आधाराने मुरबाड नगरपंचायत आपल्या
तिजोरीत जमा करित आहे.तरी देखील प्लॅस्टिक पिशव्या आजही डिलरकडून काही दुकानदारांना
पाहोच होतच आहे.करण्यात येणार्या कारवाईला मुरबाड नगरपंचायतीने एैन रक्षाबंधन,गणपती
सणातच सुरू केली असल्याने भाजीपाला नागरिकांना हातात घेऊन जाण्याची वेळ आली.मुरबाड
नगरपंचायत प्लॅस्टिक पिशव्याच्या नावाखाली दंड गोळा करून तो दंड कोणत्या तिजोरीत जमा
करून त्या दंडाचा उपयोग कुठे करणार यासंदर्भात आम्ही लवकरच पाठपुरावा करणार आहोत.मांसाहरी
घेऊन जातांना आता भांडा किंवा घमेला हातात घेऊन जावे लागणार असून प्लॅस्टिक पिशव्या
बंदी पुढे किती महिणे बंद असेल याकडे लक्षच लागून राहणार आहे.प्लॅस्टिक पिशव्या बंदी
संदर्भात अनेकांना अगोदरच मुरबाड नगरपंचायतीने पत्रव्यवहार केले असतांना मुख्यकर्ता
डिलर मात्र मुरबाड नगरपंचायतीच्या समोर अद्दयापतरी आलेला नाही.त्यामुळे काहींवर ओळखीचे
व्यवसाय मालक असल्याने मोठ मोठया पिशव्या देत असून त्यांना खतपाणी घातले जात असल्याची
चर्चा आहे.न्याय कराल तर सर्वांना समान करा अन्यथा आमच्यावर अन्याय आम्ही सहन करणार
नसल्याच्या तीव्र भावना व्यवसायकानी आमच्याशी बोलतांना व्यक्त केल्या आहेत.काही दिवसांत
दुधासाठी भांड घेऊन जाण्याची वेळही नगरपंचायत करू शकते अशी शक्यता वर्तवली जात असून
लहान असो किंवा मोठी प्लॅस्टिक पिशव्या बंद कराल तर पूर्ण करा असे जनमाणसांतून बोलले
जात आहे.प्लॅस्टिक पिशव्यावरील बंदी जरी केली असली तरी आजही कचराकुंडीमध्ये प्लॅस्टिक
पिशव्याच जादा प्रमाणात दिसून येत आहे.काही दिवसांत अशीही वेळ मुरबाड नगरपंचायत आणेल
कि घरातील कचरा कागदात भरून टाका,कचर्यासाठी पिशवी नका वापरू अन्यथा दंड करू.याकरिता
भविष्यात कायदयाच्या व नियमाच्या नावाखाली हप्तेबाजी देखील कर्मचारी सुरू करतील त्यामुळे
असेच सुरू राहिल्यास येणार्या काही दिवसांत व्यवसायक असो किंवा नागरिक मुरबाड नगरपंचायतीच्या
दालनात उपोषण तसेच आंदोलनाचा पावित्राही हाती घेतील ती वेळ लांब नसेल अशी शक्यता काल्पनिक
स्वरूपात व्यक्त केली आहे.
Post a Comment