दि,06,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड शहरातील नामांकित
असलेल्या इएसआयसी सेकेंडरी हॉस्पिटल मध्ये झालेल्या 7 ते 8 कोटी भ्रष्टाचारासंदभात
तक्रारदारांनी महाराष्ट्र राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री तसेच मुंबई येथिल इएसआयसी
विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहायक निदेशक,समन्वय शाखा क्षेत्रीय कार्यालायचे अधिकारी जितेंद्र
खेरनार यांना पत्रव्यवहार करून कारवाई तसेच गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी केली होती
त्यासंदर्भात स्वतंत्र पथक नेमून चौकशी करावी अन्यथा 15 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रालयाच्या
दालनासमोर आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता त्या अनुषंगाने सदर पत्राची व मागणी
दखल घेत संबंधित महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे
कार्यालय मुुंबई परेल इएसआयसी विभागाकडून संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्यात
आले असून त्या भ्रष्टाचारासंदर्भातील चौकशीचे स्वतंत्र पथक नेमून एक समिती गठित करण्यात
आलेली असल्याचे पत्र आज तक्रारदारांना प्राप्त झाले आहे.यामध्ये चौकशी चेंडू मंत्रालयाच्या
दालनात गेल्याने मंत्रालयाला खरे कि खोटी माहिती दिली जाते याकडे लक्ष लागून राहिले
आहे.गेल्या काही महिण्यापूर्वी भ्रष्टाचाराचा हाच मुद्दा तापलेला असताना काही सेकेंडरी
हॉस्पिटलनी कालांतराने आपले रंग दाखविण्यास सुरू केली होती परंतु चौकशी सुरू असताना
अद्दयापही ती चौकशी पूर्णपणे झालेली नसून भ्रष्टाचाराचा मुद्दा कायमच पत्रावये अधिकारी
यांनी धूळखात ठेवला आहे.परंतु तक्रारदार यांनी हा मुद्दा कधीच सोडलेला नसल्याने अखेर
आमरण उपोषणाच्या न्यायीक लोकशाही मार्गाने पुन्हा चौकशी करून थेट डॉक्टरावर गुन्हा
दाखल करून हॉस्पिटलचे लायसन्स रद्द करावे अशी ठाम भूमिका घेतली आहे.अलीकडे याच इएसआयसी
हॉस्पिटलमध्ये ब्लड प्रेशर च्या गोळया रूग्णांना नसल्याने त्यांनी ग्रामीण रूग्णालय
मुरबाड येथे धाव घेतली असल्याने हा प्रकार उघड झाला असून या गोळया अखेर आल्या किती
आणि गेल्या कुठे? कोणकोणते डॉक्टर सर्जरी करता येतात त्यांचा करारनामा आहे कि नाही,जर
नसेल तर कोणत्या आधारावर त्यांना इएसआयसी रक्कम देण्यात येते ? कोणत्या अकाऊंटनी दिली
जाते ? त्यांचे इमारती एफएसआय बरोबर जागेचा नकाशा असे अनेक प्रश्न या तक्रारीत उपस्थित
असताना यावर कशा पध्दतीने स्वतंत्र पथक कारवाई करून भ्रष्टाचार बाहेर काढून गुन्हा
दाखल करते याकडे लक्ष लागून आहे.तक्रारदारांना वरिष्ठांनी 3 दिवसांत अहवाल सादर करून
आपणांस देण्यात येणार असल्याचे लेखी पत्रान्वये सांगण्यात आले असून 3 अधिकारी यांची
नियुक्ती या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी केली आहे.त्यामुळे हे अधिकारी कितपयंत
अहवाल खरेच्या बाजुने व खोटेच्या बाजूने देतील यावर चांगलेच लक्ष तक्रारदाराचे असून
अहवाल खरे च्या बाजुने जाणून बुजून लावल्यास 15 ऑगस्ट रोजी स्वातंञ्य दिनी आमरण उपोषण
कायम ठेवण्यात येणार असल्याचे आज या माध्यमातून सांगण्यात आले आहे.मुरबाड शहरातील इएसआयसी
हॉस्पिटलच्या झालेल्या गैरकारभारात सरकार नेमकी यावर काय कारवाई करेल व तक्रारदाराला
15 ऑगस्ट रोजी अगोदर न्याय देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करेल की त्यांना आमरण उपोषण
करण्यास भाग पाडेल याकडे लक्ष लागून आहे.

Post a Comment