दि,13,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
आदिवासी क्रांतीदिन दिनाचे औचित्य साधून
महाराष्ट्राचे लाडके,मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या
शुभहस्ते लांबाचीवाडी येथे हायटेक सह भव्य विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.मुरबाड
नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मधील आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या भागात अनेक वर्षा
नंतर विकास दिसून आला आहे.मा.नगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ.मानसी मनोज देसले व समाजसेवक
मनोज रमेश देसले यांनी कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच
त्यांच्या सहकार्याने प्रभाग क्र.2 मध्ये विकासाची गंगा वाहू लागली आहे.या प्रभागाचा
विचार केला तर अगोदरचा भकास आणि त्यानंतरचा विकास पाहायला मिळत आहे.या प्रभागात झालेला
विकास कौतुकास्पद असून विकासाचे वादळाने कायापालट करून टाकले आहे.या प्रभागात सुसज्ज
नविन सभागृह,तरूणांसाठी अद्ययावत व्यायामशाळा व बलोपासनेसाठी हनुमानाचे मंदिर या हायटेक
वास्तुंचे लोकार्पण आदिवासी गौरव दिनी करून आदिवासी बांधवांना एक अनोखी भेट दिली आहे.
मुरबाड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण ठाणे
जिल्हात अशा प्रकारचा आदिवासी वस्तीतील विकास पाहायला मिळत असून देसले दांपत्यांनी
हे काम करून दाखविल्या बद्दल आमदार किसन कथोरे यांनी दोघांचे मनापासून कौतुक केले आहे.या
वेळी आमदार श्री.कथोरे यांनी तुम्ही काम करत राहा मी तुमच्या पाठीशी आहे,काही नगरसेवक
बोलण्यात पोपट आहेत,माझ्याशिवाय ते नगरपंचायतमध्ये कशी कामे करतात हे मला पाहायचे आहे,येईल
त्याला पायाखाली घाला आणि आपल्या मुरबाडचा विकास करा असा सज्जड दम इशारा अधिकतेतच पक्ष
सोडून गेलेल्यांना दिला आहे.मुरबाडचा विकास थांबणार नाही तर तो अधिक जोमाने होत राहिल
पाहिजे तेवढा निधी मुख्यमंत्री द्यायला तयार असल्याचे यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी
बोलताना सांगितले.यावेळी समाजसेवक मनोज रमेश देसले यांनी आपल्या संभाषणात आम्ही राजकारणात
तत्वाशी गद्दारी करणार नाही,एकवेळ राजकारण सोडू पण गद्दारी नाही.जे आहे ते प्रामाणिकपणे
करतो,समाजासाठी आपल्या भावना काय आहेत हे महत्वाचे असून जनतेची सेवा हिच ईश्वर सेवा
असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.आज आमच्या वाडीत झालेला विकास हायटेक म्हणून
संबोधित झाले आहे नेहमी प्रत्येकाच्या सुख दुखात येऊन चौकशी करणारा समाजसेवक आम्ही
दुसरा कोणी पाहिला नसल्याच्या भावनिक भावना याप्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त करून नगरसेविका
सौ.मानसी देसले व समाजसेवक मनोज रमेश देसले यांचे आभार मानून त्यांचा भव्य सन्मान याप्रसंगी
केले.या लोकार्पण सोहळयाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर सर,मंडळ
अध्यक्ष दिपक पवार,ज्येष्ठ सुधीर तेलवणे,मा.नगराध्यक्ष मोहन सासे,नगरसेविका सौ.मधुरा
सासे,साजई सरपंच सौ.सासेताई,देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे,नगरसेवक अक्षय
रोठे,कृष्णकांत मलिक,आरपीआयचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे,जगन माळी,केशव देसले,मिलींद
मडके,अॅड.सचिन चौधरी,रविंद्र पठारे,जिल्हापरिषद व पंचायत समिती,ग्रामपंचयात सरपंच
व सदस्य,सामाजिक संस्था व संघटनांचे पदाधिकारी यांच्यासह मोठया संख्येने आदिवासी बांधव,महिला
व तरूण वर्ग नागरिक उपस्थित होते.यावेळी आदिवासीचे दिनाचे औचित्य साधून महिला व तरूणींनी
पारंपरिक आदिवासी पद्धतीने नृत्य सादर करून आमदार किसन कथोरे यांचे भव्य असे स्वागत
केले.

Post a Comment