दि.12,POL- कुणाल शेलार,मुरबाड -
काल मुरबाड पोलीस ठाणे आणि न्यू इंग्लिश स्कूल,मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली होती या रॅलीत कार्यसम्राट आमदार श्री.किसन कथोरे हे आवर्जुन सहभागी झाले होते.
ही रॅली न्यू इंग्लिश स्कूल येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक,मुरबाड पोलीस ठाण्यापर्यंत आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन आणि घोषणा देत समाजप्रबोधन केले. "अमली पदार्थांना ना म्हणूया", "स्वस्थ आयुष्य जगूया" अशा घोषणा देत त्यांनी अतिशय सकारात्मक संदेश दिला.
आमदार श्री.कथोरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना अमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक,मानसिक व सामाजिक परिणामांची जाणीव करून दिली.अमली पदार्थांचे व्यसन हे समाजातील तरुण पिढीला अंधकाराकडे नेत असून अशा सवयींपासून दूर राहून युवकांनी शिक्षण,उद्योग आणि सेवाभावाकडे वळावे, हेच आजच्या रॅलीचं मुख्य उद्दिष्ट आहे,असे सर्वांना आवाहन केले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे,शिक्षकांचे,पोलीस प्रशासनाचे आणि नागरिकांचे आमदार किसन कथोरे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. समाजाच्या उन्नतीसाठी आणि नशामुक्त महाराष्ट्रासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे हीच खरी काळाची गरज आहे आणि या मोहिमेसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आमदार श्री. कथोरे यांनी दिले.
या भव्य रॅलीला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे, भाजप नेते भरत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर सर, सुधीरभाई तेलवणे, मा. नगराध्यक्ष मोहन सासे, आरपीआयचे अध्यक्ष दिनेश उघडे,नगरसेविका सौ.मानसीताई देसले, समाजसेवक मनोज देसले,युवा कार्यकर्ते अतुल देशमुख, खरेदी विक्री संघाचे चेअरमन संतोष पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड विभाग अनिल लाड,मुरबाड पोलीस ठाण्याचे वपोनि संदीप गिते,पीएसआय अरमाळकर,पोलीस हवालदार विजय कांबळे,न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड चे प्राचार्य राकेश पाडवी सर व अन्य शिक्षक,विद्यार्थी यांची उपस्थिती होती.






Post a Comment