दि,16,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्यात काल 79 वा स्वातंञ्य दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.मुरबाड शहरातील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये संस्थापक अध्यक्ष आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते तर मुरबाड तहसिलदार कार्यालय येथील आवारात तहसिलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते,मुरबाड ग्रामीण रूग्णालय आवारात ध्वजारोहण साजरा करण्यात आला.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी केंद्र व राज्य स्तरावरील शासकीय योजना तळागळात असलेल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शाळा महाविद्दयालय शिव्या मुक्त होण्यासाठी सर्व जणांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.यावेळी न्यू इंग्लिश स्कूलच्या निवृत्त शिक्षकांचा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य राकेश पाडवी सर,पवार मॅडम,उपप्राचार्य श्री.कराळे सर,प्रदीप धोंडगे पाटील सर,श्री.गोडांबे सर,जाधव सर,बडगुजर सर,भालेराव सर,यांच्यासह अन्य शिक्षक विद्दयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
तर मुरबाड तहसिल कार्यालयात ध्वजारोहणावेळी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गिते, व त्यांच्या सहकार्यांनी ध्वजाला मानवंदना दिली.मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख,नायब तहसिलदार अमोल शिंदे,निवासी नायब तहसिलदार श्रीमती.सुषमा बांगर मॅडम,वपोनि.संदीप गिते यांच्या हस्ते स्वतंत्र सैनिकांच्या नतेवाईकाचा सन्मान करण्यात आला.यावेळी मुरबाड नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय कोरडे,गटशिक्षणाधिकारी श्री.थोरात तसेच सामाजिक,राजकीय,प्रशासकीय अधिकारी कर्मचारी,पत्रकार यावेळी उपस्थित होते.
याच दिनी मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे
आवारात झेंडयाला मानवंदना देत मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकीय अधिक्षीक डॉ.संग्राम
डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी आपण भारतीय असून या भारताच्या,महाराष्ट्राच्या,जिल्हयाच्या,तालुक्याच्या,गावाच्या,तळागळाच्या
जनतेच्या सेवेसी एकनिष्ठेने तत्पर राहू व आपले कर्तव्य पार पाडु असे वचन घेतले.यावेळी
क्लार्क श्री.सुरवसे सर,श्री.पवार,अक्षय तांदळे,डॉ.स्वप्निल वाकचौरे,डॉ.जाधव,श्री.गोपाळ
बोभाट,श्री.रातांबे यांसह सर्व डॉक्टर,अधिपरिचारिका,कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
म्हसा येथिल जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित सौ.कमलताई किसन कथोरे कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्दयालय येथेही मोठया
थाटामाटात ध्वजारोहण साजरा करण्यात आला.यावेळी संस्था मंडळासह प्राचार्य योगेश माळी,प्रा.विजय
सोनार,शिक्षक संदीप भावार्थे,निलेश शिंदे,दिक्षा बोटकुंडले मॅडम,एचएस पवार यांच्यासह
मोठया संख्येने शिक्षक,कर्मचारी,विद्दयार्थी विद्दयार्थीनी उपस्थित होते.याप्रसंगी
प्रा.योगेश माळी यांनी विद्दयार्थ्यांना भारतीय असल्याचे आपणाला अभिमान असून या देशाच्या
हितासाठी तुम्ही भविष्य आहात,देशाची ताकद एकजुट ठेवण्यासाठी पुढिल पिढींनी एकता ठेवून
देशकल्याणासाठी आपले पाऊल पुढे टाकले पाहिजे असे अमुल्य मार्गदर्शन केले.







Post a Comment