दि,16,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
संघर्ष पत्रकार संघ,ठाणे जिल्हा वतीने 15 ऑगस्ट स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधत भारतीय सीमेवर लढणार्या सैनिकांच्या आई वडिलांचा तसेच मुरबाड,शहापूर,कल्याण तालुक्यातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार सोहळा मोठया थाटामाटात पार पडला.या सोहळा कार्यक्रमाला महाराष्ट्राचे लाडके,मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.या कार्यक्रमाला भारतीय सीमेवरील लढणार्या सैनिकांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आल्याने हा सोहळा अविस्मरणीय ठरला आहे.यावेळी गुणवंत व्यक्तींच्या सत्कार सोहळयामध्ये महाराष्ट्राचे लाडके साईभक्त गायक जगदीशदादा पाटील यांना आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी त्यांच्यावरील गायलेल्या ''चष्मा जाईल खाली'' या गाण्याचे जगदीश पाटील यांची गाणं सुंदर गायले म्हणून प्रशंसा केली.
संघर्ष पत्रकार
संघ ठाणे जिल्हा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सत्कार सोहळयाचीही प्रशंसा आमदार श्री.कथोरे
यांनी केली.या कार्यक्रमाचे आयोजन संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे,मुरबाड
तालुकाध्यक्ष नरेश म्हाडसे यांनी केले होते.या कार्यक्रमाला सैनिकांचे आईवडिल यांच्यासह
गुणवंत व्यक्ती,पत्रकार,नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.हा सोहळा मोठया थाटामाटात
पार पडला असून या सोहळयानी आम्ही भारतीय असून खरी माणूसकीची झरी जपली हाच संदेश संपूर्ण
जिल्हयासह देशभरात गेला आहे.



Post a Comment