BIG BREAKING NEWS...

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे पारदर्शक अधिकारी ; मुरबाड तालुक्यात कॅन्सर स्क्रिनिंग मोहीम जोमाने सुरू...

 

दि,19,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध समस्या तक्रारी असतात अशा समस्या,तक्रारींवर तात्काळ लक्ष केंद्रित करून तक्रारदारांना समाधानकारक उत्तर मिळाल्याने येथील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे डॉ.गंगाधर परगे यांचा सिंहाचा वाटा ठरला आहे.तळागळातील प्रश्‍नावर प्रथम लक्ष वेधून त्यावर निरासरण म्हणून मार्गी लावणे करिता जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे डॉ.गंगाधर परगे हे प्रयत्नशील असल्याचे सिद्ध झाले असून त्यांच्या या धडाकेबाज कार्याला ग्रामीण भागातील नागरिकांबरोबर वरिष्ठ अधिकार्‍यांनीही त्यांचे कार्यशैलीचे कौतूक केले आहे.

कोणतेही एखादी तक्रारीचे समस्याचे प्रकरण समोर आलेच तर निर्भिडतेने प्रशासक भूमिका साकारत कारवाई करण्यासाठी निर्देश,आदेश देतात.ही भूमिका आम्ही देखील जवळून पाहिली आहे.वेळोवेळी शासनाच्या आदेशाचे व निर्देशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अधिकारी  यांच्यासह संबंधित हॉस्पिटल,प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ.गंगाधर परगे यांनी दिल्या आहेत.पुरवेनिशी तक्रार आल्यास कारवाई करण्यासाठी कोणाचीही गय केली जात नसून विविध प्रलंबित प्रश्‍नांना मार्गी लावण्यात त्यांना यश आले असल्याने डॉ.गंगाधर परगे यांच्या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याची भूमिका धडाकेबाजीचीच असल्याचे नागरिकांनी म्हंटले आहे.सर्वसामान्य जनतेला वेळात वेळ देतात,जनसामान्यांच्या सदैव पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रेरणादायी संदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे समाजसेवी कार्यातून कार्य करताना दिले असल्याचे निदर्शनास आले आहे.

          डॉ.परगे यांनी शासनाच्या योजना तळागळात पोहोचवून जनजागृती केली असून कर्करोग,किडनी,हृदयविकार सारखे आजारावर शासकीय योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदतीचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला आहे.ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ माहिती नसलेल्यांनाही जनजागृतीवर विशेष भर देत त्या योजना मिळवून देत मदतीचा हात त्यांनी दिला आहे.त्यामुळे माणसातील माणुसकी झरी जपत नैतिकता जपणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या कार्याची स्तुती,प्रशंसा ग्रामीण भागातील नागरिक करीत असल्याने धडाकेबाज अधिकारी ठाणे जिल्ह्याला लाभले असलेले चर्चा नागरिकांनी केली जात आहे.

          त्याचबरोबर बोगस डॉक्टरांची सावली ही मुरबाड तालुक्यात नाहीशी झाली असून दर महिण्याला वेळोवेळी चांगलाच संबंधित अधिकारी यांचा समाचार घेतला आहे.अशा दर महिन्याच्या बोगस डॉक्टर प्रतिबंधात्मक मिटिंगमध्येही जिल्हा आरोग्य अधिकारी ठाणे डॉ.गंगाधर परगे हे चांगलाच आढावा घेत असून ग्रामीण भागात बारकाईचे त्यांचे लक्ष लागून आहे,त्यामुळे लुटमारी व बोगस डॉक्टरांना चांगलाच चाप बसला आहे.ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्‍नावर सदैव लक्ष ठेऊन असणारे व आपल्या प्रशासकीय कामात पारदर्शक भूमिका साकारणारे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे चर्चेत राहिले असून ग्रामीण भागासह शहराची माहिती घेऊन शासकीय योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी त्यांच्या प्रशंसी कार्याची धडपड सर्वांनी जवळून पाहिली आहे.त्यांच्या कालावधीत गाव खेडेपाड्यात प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करणे,पैसे घेऊन काम करणे तसेच साटेलोटे सर्व काही त्यांनी बंद केले असून पत्रकारांनीही त्यांच्या पारदर्शकतेच्या कार्याचे कौतुक केले आहे.शासनाच्या नियमानुसार अधिकारी वर्गांनी पारदर्शकतेने काम करून एक पैशाचीही अपेक्षा कोणाकडून करू नका असा सज्जड इशाराही त्यांनी वेळोवेळी दिल्याने  शासनावर विश्‍वास संपदीत करून देतांना नागरिकांची मने त्यांनी जिंकून घेतली आहे.

          मुरबाड तालुक्यात सध्या श्री.डॉ.परगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर स्क्रिनिंग मोहीम राबविण्यात येत असून तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्व नागरिकांच्या तपासण्याची मोहिम राबविण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर तपासणीत फिरते मशिन असून ती मशिन केवळ 3 किलो आहे.सदर मशिन कुठेही सहजपणे घेऊन जाऊन हाताळता येते.त्यातच क्षणातच तपासण्या करून रिपोर्ट मिळते.सदर एक्सरे एआय (कृत्रिम बुध्दिमत्ता) डिजीटल असून कमी रेज व एक्स्पो चे आहे.ब्लड प्रेशर,शुगर,छातीचे,तोंडाचे,गर्भाशय पिशवीचे तपासण्या या मोहिमेच्या माध्यमातून केल्या जात आहेत.एकूण 862 तपासण्या झाले असून त्यापैकीै 140 नागरिकांमध्ये आजरापणाचे असाधारण लक्षणं एक्सरे मध्ये आढळून आले आहेत तर 15 रूग्ण हे टिबी चे आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.या मोहिमेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांनी जवळून लक्ष केंद्रित केले असून 19 डॉक्टर या मोहिमेत आपले काम जोखपणे करतांना दिसले आहेत.सदर मोहिम तळागळात सुरू असून या मोहिमेच्या माध्यमातून सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवून तपासण्या करून घ्यावेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीधर बनसोडे यांनी तमाम जनतेला केले आहे.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post