दि,22,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
गेल्या एक महिण्यापासून अर्थात 25 जुलै 2025 पासून श्री क्षेत्र संगमेश्वर येथे श्रावण मासानिमित्त भव्य भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या भव्य भजन महोत्सवाची काल यशस्वी सांगता झाली.सदर भजन महोत्सवाची संकल्पना कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांची असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी सांगता भव्य दिव्य अशा गजरनामात साजरी झाली.
श्रावण मासात भक्तिमय सोहळा हा
श्री क्षेत्र संगमेश्वर येथे दुमदुमला होता.मुरबाड तालुक्यातील भजन मंडळाचे दररोज
संध्याकाळी भजनाचे कार्यक्रम आयोजित करून या मुरबाड विधानसभेत भक्तीमय सोहळयाचा पायंडा
रोवला असून आमदार किसन कथोरे यांनी या कार्यक्रमाला आपल्या देखरेखीत हे भजन महोत्सव
आयोजन केले असल्याने सर्वच भजन मंडळीनीही या महोत्सवात आपल्या सुंदर व मधुर आवाजाने
अलोट सागर उसळतानां संपुर्ण जिल्हयासह राज्याने पाहिले आहे.
या सर्व महोत्सवाचे नियोजन
टिडीसी बँकेचे संचालक राजेशदादा पाटील यांनी केले होते.या श्रावण मास महिण्यात भजनी
कलावंतांना आपली कला सादर करण्याची अनोखी संधी यावेळी मिळाली.लहान मुलं,मुली यांनी
देखील या भजन महोत्सवात आपला सहवास नोंदविला.या महोत्सवातून या तालुक्यातून खर्या
अर्थाने हिर्यांचेही दर्शन झाले.
या महोत्सवाच्या सांगता होण्या अगोदर आमदार किसन कथोरे
यांनी या तिर्थक्षेत्राला भेट देऊन या महोत्सवाला आपली प्रमुख उपस्थिती दाखवून भजन
मंडळीच्या टाळांच्या गजरात आमदार श्री.कथोरे यांनी देखील त्यांना साथ देऊन भक्तीमय
वातावरण आनंदात साजरा केला.यावेळी आमदार श्री.कथोरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सर्व
भजन मंडळीचे कौतुक करून लवकरच या तिर्थ क्षेत्र संगमेश्वर येथील शिवशंभू मंदिराचे
बांधकाम होणार असून एक धार्मिक स्थळ म्हणून सरकारने ''ब'' वर्गाला मान्यता दिली आहे.त्यातच 'झाडाला फळ नव्हती तरी दगड मारत होती परंतु आता फळ येत असल्याने दगड मारणं बंद करावं' असा सल्लाही समजनेवाले को दिला आहे.
या महोत्सवाच्या यशस्वी सांगतावेळी मुरबाड तहसिलदार
अभिजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने यांचे स्वागत करून टीडीसी बँकेचे संचालक
राजेश पाटील यांच्या हस्ते तहसिलदार श्री.देशमुख यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार
करण्यात आला.यावेळी तहसिलदार श्री.देशमुख यांनी माझ्या आई वडिलांना भजनाची आवड होती
आणि त्यांच्या याच संस्कारामुळे आज मी उपस्थित आहे.धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमातूनच
मला खरी उर्जा मिळत असल्याचे याप्रसंगी सांगितले.
मुरबाड तहसिलदार श्री.देशमुख,टिडीसी
बँकेचे संचालक राजेश पाटील,मंडळाचे तालुकाध्यक्ष दिपक पवार,जितेंद्र भावार्थे यांच्या
हस्ते महाराष्ट्राचा गोड आवाज,मुरबाडचे भूमिपुत्र गायक वैभव मंडलीक यांच्यासह भजन मंडळीचे
स्वागत करून त्यांना सन्माचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.गायक वैभव मंडलीक गुणवंत
आणि प्रभावी असलेले कलाकार गायक आहेत त्यांच्या मधुर आवाजाने या भजन महोत्सव सांगताला
सर्वच भक्तगणं तल्लीन होऊन गेले होते.
या सोहळयाला मुरबाड तहसिलदार श्री.अभिजीत देशमुख,कृषी
उत्पन्न बाजार समिती सुरेश बांगर सर,ज्येष्ठ नेते तथा मा.जिप सदस्य उल्हासभाऊ बांगर,खरेदी
विक्री संघाचे चेअरमन संतोष पवार,रेनबो सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूल मुरबाडचे संस्थापक
अध्यक्ष श्री.पंढरीनाथ बुधाजी टोले सर,गणेश कथोरे,शिवसेना तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,भाजपाचे
युवा नेते अनिल घरत,मा.सभापती सिमा घरत,नगरसेविका मधुरा मोहन सासे,मा.सभापती स्वराताई सचिन चौधरी,मा.नगराध्यक्ष मुकेश विशे,जयवंत कराळे सर,उद्दयोजक सुहास मोरे,सुभाष कडव,मिलींद (बबलू)मडके,समाजसेवक मनोज
रमेश देसले,शंकर गायकर,पत्रकार दिलीप पवार,संजय बोरगे यांच्यासह मोठया संख्येने नागरिक
भजनप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी नवी मुंबई चे डॉक्टर यांनीही या महोत्सवाला भेट देऊन आमदार
किसन कथोरे यांच्या संकल्पनेचे कौतुक केले.

.jpeg)

.jpeg)
.jpeg)


Post a Comment