दि,25,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
महाराष्ट्राचे लाडके,मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी विधानसभेच्या निवडणूकीवेळी मुरबाड बस स्थानक सुसज्ज व भव्य दिव्य करणार असल्याने त्याकरिता 13 कोटीचा निधी उपलब्ध करून दिले असून त्याचे काम लवकरच प्रगतीपथावर येणार असल्याची प्रतिक्रिया देत मुरबाड बस आगारात नवे बस आपण शासनाच्या माध्यमातून आणणार आहोत असाही शब्द दिला होता त्या शब्दाला अखेर आमदार किसन कथोरे यांनी पूर्ण केला आहे.ऐन गणपती सणात मुरबाड तालुक्यातील प्रवास सुखकर व्हावा याकरिता आमदार श्री.कथोरे यांच्या प्रयत्नामुळे 5 नव्या बस मुरबाड आगारात दाखल झाल्या आहेत.त्या अगोदर 5 बसेस मंजूर झालेल्या यापुर्वीच दाखल झाल्या होत्या त्यानंतर या नव्या बसेस उपलब्ध झाल्या असून या 5 बसेस पैकी 3 बसेस मुरबाड कल्याण धावणार असून 2 बसेस मुरबाड शहापूर येथे धावणार आहे.यानंतर उर्वरित इलेक्ट्रॉनिक बसेस लवकरच आपण मुरबाड आगारात आणणार असून तद्नंतर पुढील बसेस या वातावरणाकूल असणार असल्याचे आमदार श्री.कथोरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.गौरी गणपती सणात नागरिकांसाठी 5 बसेस दाखल झाल्याने मुरबाडकरांनी आनंद व्यक्त केला असून आमदार किसन कथोरे यांचे आभार मानले आहेत.याप्रसंगी 5 नव्या बसेसचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला असता आमदार श्री.कथोरे यांनी नव्या बसमध्ये प्रवास करून बस आगारातून मार्गस्थ केले.आपला मुरबाड लवकरच हायटेक होणार असून कल्याण मुरबाड रस्त्याचे काम जोमाने सुरू आहे त्यामुळे हा रस्ता उत्तम क्वॉलिटीचा असून आपण स्वतः आपल्या रस्त्याचे व समृध्दी रस्त्याचे पाहणी करावे तेव्हा आपणाला दिसेल की दर्जेदार रस्ता कोणाचा आहे म्हणून.मुरबाड शहराचा लूक आता बदलला असून मुरबाड उड्डाणपुलाचे काम लवकरच पूर्ण होणार असून ते झाल्यावर मुरबाड शहराचे वेगळे रूप पाहायला मिळणार आहे.या नव्या बस मुरबाड शहराला मिळाले असून महाराष्ट्रात पहिला नंबर आपल्या मुरबाडचा लागला असून परिवहन मंत्री यांनी सुध्दा सांगितलं की पहिले बस मुरबाडला जाऊदे त्यामुळे मुरबाडकरांना गणपती सणाच्या अगोदरच मुरबाडकरांना खर्या अर्थाने ही भेट मिळाली आहे.अजून 10 गाडया लवकरच आपण मुरबाडला आणत आहोत.
मुरबाडच्या
रस्त्यामध्ये काही जण टोचून पिणा मारत असून काम संत गतीने झाले असे बोलतात परंतु रस्ता
चांगला झाला की लोक कधी बोलत पण नाही आणि पत्रकारांनीही त्यांना सांगायला पाहिजे की,रस्त्याचे
काम चांगलं व्हावं म्हणून सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे,मुरबाड बस स्थानकाचा मॉडेल
आपण हाती घेतलं आहे त्यामुळे चांगल्या पध्दतीने स्थानक होणार आहे त्यातच मुरबाड बदलापूर
प्रवाशांसाठीही 2 महिण्यानंतर जादा बस सेवा आपण सुरू करित आहोत.आज बसचा प्रवास करित
असताना नागरिकांना काय त्रास होतो हे पाहण्याची प्रत्यक्ष संधी बरेच महिण्यातून मिळाली
असून त्यांचा त्रास कसा कमी करायचा हे आता मी बघेल आणि माझ्या गाडीत तर कोणी बसायला
येत नाही परंतु मी तुम़च्या सोबत आज बस मधून प्रवास करतोय ही संधी मला लाभली हे माझं
भाग्यच आहे असे बोलून समजनेवाले को टोमना मारला आहे.या लोकार्पण सोहळयाला उल्हासभाऊ
बांगर,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष कांतीलाल कंटे,रिपाईचे तालुकाध्यक्ष दिनेश उघडे,कृषी
उत्पन्न बाजार समितीचे संचलाक सुरेश बांगर सर,टिडीसी बँकेचे संचालक राजेशदादा पाटील,टिडीसी
बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक श्री.घुडे,सुहास मोरे,मा.नगराध्यक्ष किसन अनंत
कथोरे,मोहन सासे,मुकेश विशे,समाजसेवक मनोज रमेश देसले,अॅड.सचिन चौधरी,मंडळ तालुकाध्यक्ष
दिपक पवार,जितेंद्र भावार्थे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संतोष पवार,खरेदी विक्री
संघाचे संचालक मिलींद (बबलू)मडके,जयवंत कराळे सर,आण्णा साळवे,रविंद्र देसले,दिलीप देशमुख,नरेश
मोरे,आगाराचे श्री.गंभीरराव,समाजसेवक कल्पेश धुमाळ,जिवन विशे,ज्योती गोडांबे यांच्यासह
कार्यकर्ते,नागरिक,पत्रकार उपस्थित होते.

.jpeg)
.jpeg)
Post a Comment