दि.29,BY,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
दि.१८ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट,२०२५ दरम्यान कलानी महाविद्यालय उल्हासनगर येथे प्रकृती बंधन - आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विविध स्पर्धा पार पडल्या त्यातील निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा या मध्ये आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु.रोहिणी गणपत चौधरी हिने प्रथम क्रमांक पटकावला.यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा यथोचित असा सन्मान करण्यात आला.सदर विद्यार्थिनी ही तृतीय वर्ष विज्ञान (रसायनशास्त्र) वर्गात शिकत आहे. तब्बल १२० हुन अधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. तिच्या या यशाबद्दल जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.रविंद्र घोडविंदे सर,संस्थेचे संचालिका सौ.स्मिता घोडविंदे मॅडम,संचालक श्री.प्रशांत घोडविंदे सर,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश माळी सर यांनी कौतुक व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख स. प्रा. विजय सोनार,स.प्रा.तनुजा देसले (सदस्य) तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीदेखील विद्यार्थिनीचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.


Post a Comment