दि,27,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड शहरातांर्गत सेकेंडरी
टायअप अंतर्गत ईएसआयसी कंपनीचे कामगारांवर उपचार सर्जरी करिता एका खाजगी हॉस्पिटलला
ठेकेदारी मिळाली असून याच खाजगी हॉस्पिटलनी गेल्या सन 2022 सालात 7 ते 8 कोटीचा खोटे
बिल,रूग्ण जास्त दिवस उपचाराकरिता दाखल असल्याचे दाखवून घोटाळा अर्थात भ्रष्टाचार केला
आहे.यामध्ये मोठ मोठे अधिकारी यांचे संगणमत असल्याचा संशय वर्तविला जात असून ही साखळी
बिलं काढण्यापासूनची असल्याचे जाणकरांचे मत असून एका तक्रारदाराने याबाबत सविस्तर माहिती
घेत पाठपुरावा सुरू केले असता ती तक्रार केंद्र शासनकडे करून राज्य शासनाच्या समोर
आणून दिली.त्यावर कोणतीही कार्यवाही तथा घोटाळयाचे साक्षमोक्ष करण्यात आले नसुन तक्रारदारानी
पुन्हा यावर चौकशी करून अहवाल सादर करित संबंधित डॉक्टरांवर बनावट तसेच घोटाळा करणे
प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून हॉस्पिटलचे लायसन्स कायमस्वरूपी काळया यादीत टाकून
सविस्तर माहिती पत्राद्वारे नमूद केले होते यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांबरोबर संबंधित
विभाग अधिकारी यांना पत्रव्यवहार केले असता पत्राची दखल ईएसआयसी अर्थात राज्य कामगार
विमाचे वरिष्ठ अधिकारी वरळी मुंबईचे मुख्याधिकारी यांचे कार्यालयाचे अधिकारी संचालक
यांनी घेतली व एक समिती गठित केली सदर समितीत बिलं काढणारी उल्हासनगर येथिलच अधिकारी
यांच्याच हाती “ खरे ’’ला वाचविण्यासाठी सुत्र सोपविले.यानंतर 3 दिवसांत चौकशी करून
अहवाल सादर करावयास सांगितले असता समिती येणार आहे याची माहिती सेकेंडरी टायअप अंतर्गत ईएसआयसीमध्ये घोटाळा झालेल्यांना कळाली त्याबाबत सर्व नर्स स्टाफ यांना पोशाख व स्वच्छता
स्वच्छ ठेवण्याचे रणशिंगाण फुंकले परंतु याची माहिती वेळोवेळी तक्रारदाराला त्यांच्याच
हॉस्पिटलमधून सुत्रांकडून मिळत होती.त्या अनुषंगाने तक्रारदाराने जाणून घेतले कि साखळी
ही थेट उल्हासनगर येथून जोडली गेली आहे.त्यानंतर उल्हासनगर ईएसआयसी विभागांना 3 दिवसांत
चौकशी अहवाल सादर न करता थेट तक्रारदारालाच उलटतपासणी करिता बोलविल्याने तक्रारदारानीही
खेळी केली.तक्ररदारानी सर्व कागदोपत्री पुरावे देत सविस्तर घोटाळा झाल्याची बाजू मांडली
व लेखी जबाब दिले परंतु कालांतराने त्या डॉक्टरांना सुचित करून तक्रारदाराची दिशाभूल
करून ईतिवृत्त मनमानी पध्दतीने तयार करून खरे च्या बाजुने अहवाल सादर करून त्यांच्या
म्हणणेनुसार तक्रारदाराबरोबर वरिष्ठांना खोटे अहवाल देत अहवाल केवळ एकाचेच सादर केले.यामध्ये
सविस्तर उलट तपासणी तक्रारदाराची केली असल्याने त्याबाबत ऑडीओ रेकॉर्डींग तक्रारदाराकडे
असून सविस्तर चर्चा नमूद आहे या संबंधी खरेच्या बाजुने तक्रारदाराला खोटा अहवाल दिले
असल्याचा व एका डॉक्टर बरोबर झालेल्या संभाषण पोलखोल बरोबर उल्हासनगर समितीची रेकॉर्डींग
हा सर्वात मोठा पुरावा तक्रारदाराने गोपनिय पध्दतीने साठवणूक ठेवल्याने याबाबत तक्रारदार
थेट आता यावर ईडी कडे धाव घेऊन सर्व पुरावे सादर करून याबाबत संगणमतीने “खरे’’ ला
वाचविण्यासाठी कशा पध्दतीने षडयंत्रणा रचली गेली याबबात लवकरच 7 ते 8 कोटीच्या घोटाळयाची
चौकशी करून सेकेंडरी टायअप अंतर्गत ईएसआयसी खाजगी हॉस्पिटलच्या सर्वच डॉक्टरांवर
गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.यासंदर्भात बातमी काही दिवसांपूर्वी
आली असता वरिष्ठ अधिकारी यांनी प्रशासकांची चर्चा केली असता तक्रारदारांकडून पुरावे
घेऊन आम्हाला अवगत करावे असे आदेश दिल्याने यावर लवकरच स्वतंत्र पथक नेमून पुन्हा सखोल
चौकशी जिल्हयाचे मुख्य अधिकारी यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून
कळाले आहे.त्यानुसार सेकेंडरी टायअप अंतर्गत ईएसआयसी खाजगी हॉस्पिटलचे उघडं पितळ ईडी तसेच जिल्हयाचे मुख्य अधिकारी यांच्याकडून होणार असल्याने ‘‘ राजकीय वरदहस्ताचा खेळ आता चालणार नाही असा सल्ला
तक्रारदाराने दिला असून खेळ तुम्ही केला असून संपुष्टात मी आणेल,त्यांनी युक्ती लावली
परंतु मी शक्ती आणि युक्ती दोन्ही लावणार ’’ असा इशाराच या माध्यमातून दिला आहे.मुरबाड
सारख्या ग्रामीण भागातुन पहिलीच तक्रार ईडी कडे जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याने
नेमकी हा की तो नेमकी कोण अशी चर्चा आता नाक्या नाक्यावर होऊ लागली आहे.


Post a Comment