दि,30,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
ठाण्याचे जिल्हयातील मुरबाड
सारख्या ग्रामीण भागात अतिशय डॅशिंग पध्दतीने आपले कर्तव्य बजावत श्री.प्रमोद बाबर
यांनी पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारत गुंडगिरी संपुष्टात आणून अवैध धंदे बंद
करण्यात त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे सांभाळली.अनेक उपोषणे,आंदोलने त्यांनी हाताळून
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून अतिशय चांगल्या रितीने आपली कामगिरी
बजावली.श्री.बाबर यांचे उडतरे हे गाव असून या गावाचे सुपुत्र म्हणून त्यांनी या गावातून
त्यांनी घेतलेले संस्कार आणि संस्कृती त्यांच्या अंगी बाळगल्याने अनेक मंत्री महोदयांच्या
संरक्षणाचे कार्य कौतुकास्पद ठरले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद ज्ञानेश्वर बाबर
यांनी आपल्या सेवेत केलेल्य असंख्य कार्याची दखल शासनानी घेऊन त्यांची बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात सहाय्यक पोलिस आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.1993 सालात त्यांनी
उपनिरीक्षक पदी आपली कामगिरी केली असून 1994 साली घाटकोपर पोलिस ठाण्यापासून त्यांच्या
कार्याला खर्या अर्थाने सुरूवात झाली.त्यानंतर त्यांनी एसपीजीसह गोरेगाव,ठाणे,मुंबई पोलिस ठाणे,आयुक्त कार्यालय,मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त कार्यालय येथे निस्वार्थपणे
धडाकेबाजीने आपले कर्तव्य बजावत सेवा बजावली.अखेर त्यांच्या कार्याची दखल घेत युएन
मिशनसाठी त्यांची निवड करण्यात आली.त्याअंतर्गत लायबेरिया येथेही त्यांनी पाहिले असून
श्रीवर्धन,रोहा,ठाणे ग्रामीण,तसेच मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक,पोलिस
अधिक्षक कार्यालय ठाणे ग्रामीण येथे सेवा बजावली असून त्यांच्या कार्याचा ठसा सर्वत्र
उमटला आहे.श्री.प्रमोद बाबर यांच्या या संघर्षमय जीवनात त्यांनी नैतिकता जोपासून माणूसकी
झरी जपल्याने त्यांच्या कार्याची दखल शासनाने घेऊन त्यांची सहाय्यक पोलिस आयुक्तपदी
नियुक्ती केली आहे.श्री.बाबर यांच्या नियुक्तीनंतर सर्वत्र स्तरातून त्यांचे हार्दिक
अभिनंदन करण्यात येत असून त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा जनतेकडून दिल्या
जात आहेत.


Post a Comment