BIG BREAKING NEWS...

भारत वॉईन शॉपवर गुन्हा दाखल न केल्याने 5 सप्टेंबरला तक्रारदाराचा मंत्रालयाच्या दालनात उपोषण...

 

दि,30,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

गेल्या काही महिण्यापासून मुरबाड येथील न्यू इंग्लिश स्कूल,संतोषी माता मंदिर,रहदारी वस्तीत 100 ते 200 मीटरच्या आत असलेल्या भारत वॉन शॉप सर्रासपणे खुलेआम मद्दयविक्रीचा व्यवसाय अनेक वर्षापासुन चालवित असून यासंदर्भात एक तक्रारदाराने मुरबाड नगरपंचायत यांना पत्रव्यवहार केले व कशा पध्दतीने बेकायदेशीर कोणतेही कागदपत्र नसताना काही राजकीय पुढार्‍यांच्या आशिर्वादाने मद्दयविक्रीकरून अनेकांना व्यसनधीन करत असल्याचे निदर्शनास आणून दिले यावर नगरपंचायत मुरबाड यांनी तक्रारदाराला उडवाउडवीची उत्तरे देत कोणतीही कार्यवाही ही केलेली नाही.त्यातच भारत वॉन शॉप हा कोणत्या निकषावर येथे व्यवसाय करतो यावर अनेक वेळा विचारणा केली असता तक्रारदाराच्या पत्रान्वये भारत वॉन शॉपचे मालक मन्नुभा यांच्याशी संगणमताने कोणतीच कारवा न करता केवळ कागदोपत्री खेळ केला जात आहे.नगरपंचायतीच्या इमारतीखाली मद्दयसाठा गोडावून असल्याने कोणतीही उपाययोजना मन्नभा या मालकानी केलेली नसल्याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.हप्तेबाजीत गुंडाळलेल्या काही लोकांना व अधिकार्‍यांना मन्नुभा मनमानी पध्दतीने त्याचा व्यवसाय राजकीय व अधिकारी यांच्या वरदहस्ताने करतांना दिसत आहे.राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी यांनी चौकशी धाड टाकली असता त्यानंतर कोणतेही अधिकारी पुन्हा आलेले निदर्शनास कोणाला आलेले नसताना मुरबाड नगरपंचायत अधिकारी हे देखील कारवा करण्यासाठी सुस्त झाले असून तक्रारदाराने कुंपनच शेत खात असल्याचा संशय व्यक्त केला असून याठिकाणी हप्तेबाजी होत असल्याच्या संशयाने कारवा होणार नाही याची खातरजमा झालेली आहे.भारत वॉन शॉपचे मालक तक्रारदारांना माझ्या मागे सत्ताधिकारी राजकीय वरदहस्त असल्याचे खुलेआम सांगत आहे आणि मी सर्वांना मोफत दारू देत असून अनेकांच्या पावत्या फाडत आहे त्यामुळे अनेकांना मला सांभाळायचे असल्याने कारवा कसे होल याच संभ्रमात मालक मन्नुभा आहे.मुरबाड नगरपंचायतीमध्ये मन्नुभा यानी बोगसपणे केलेल्या कार्याचा पुरावा दफ्तरी असूनही राज्य उत्पादन शुल्काकडे सदर विषय ढकलून आपले हात वर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.मुरबाड नगरपंचायत केवळ कराची हप्तेवसुलीकरिता आहे का असा सवाल तक्रारदाराकडून केला जात असून झालेल्या एकमताच्या ठरावावर कार्यवाही गेल्या 6 ते 7 वर्षापासून का झालेली नाही.तत्कालीन मुख्याधिकारी यांनी कार्यवाही करू असे स्टेटमेंट एका वृत्तपत्रात दिले होते त्यानंतर आजरोजीपर्यंत कार्यवाही गुलदस्त्यात असून आम्ही कोणतीही कार्यवाही करू शकत नाही असे एका अधिकारी यांनी सांगून तक्रारदाराच्या भुवय्याच उंच करून ठेवल्याने मुरबाड नगरपंचायतचे अधिकारी कर हप्तेवसुलीमध्ये सुस्त असून येथून कोणतीही कार्यवाही होऊन भारत वॉन शॉपवर गुन्हा दाखल करू शकत नसल्याचे त्यांच्या उडवाडउडवीच्या उत्तरावरून कळते त्यामुळे तक्रारदाराने 26 ऑगस्ट 2025 रोजी थेट राज्याचे पारदर्शक,कुशल,मुख्यमंत्री महोदय यांच्यासह संबंधीत विभाग अधिकारी यांनी निवेदन पत्राद्वारे 5 सप्टेंबर 2025 रोजी मंत्रालयाच्या दालनात आमरण उपोषण करण्याचा पावित्रा घेतला आहे.या आमरण उपोषणाची वेळ मुरबाड नगरपंचायतीने आणून दिले असून हे उपोषण अतिशय उग्रपणे छेडला जाणार असल्याचे तक्रारदारानी बोलतांना सांगितले असून आता मुरबाड नगरपंचायतीच्या कोणत्याच भुलथांपाना बळी पडणार नसून कोणाकोणाचे बेकायदेशीर भारत वॉन शॉपला पाठिंबा आहे आणि कोण राजकीय वरदहस्त व अधिकारी मन्नुभाची पाठराखण करतोय हे लवकरच उपोषणातून जनतेसमोर आणणार असल्याचे बोलले जात असून आता या आमरण उपोषणातून काय पोलखोल होते,राज्य सरकार कशापध्दतीने कारवा तसेच गुन्हा दाखल करते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post