BIG BREAKING NEWS...

आमदार किसनजी कथोरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन ; साहेबांवर प्रेम करणार्या इच्छुक रक्तदातेंनी रक्तदान करावे...

 

दि,12,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

महाराष्ट्राचे लाडके,मुरबाड विधानसभा मतदार संघाचे,विकासाचे शिल्पकार कार्यसम्राट दमदार आमदार श्री.किसनजी कथोरे साहेबांचे येत्या 19 सप्टेंबर 2025 रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्वत्र ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून प्रथमच मुरबाड ग्रामीण रूग्णालय,मुरबाड येथे आमदार श्री.किसनजी कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वार,बुधावार दि.17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी ठिक 10 वा.ते दुपारी 3 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.या शिबीर कार्यक्रमाला आमदार श्री.कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या शुभहस्ते सुरूवात होणार आहे.

          रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याचे कारण असे की,आज काही गरिब गरजूंना,अपघातग्रस्तांना तसेच अन्य आरोग्य दृष्टिकोणाच्या कारणास्तव जीवनदानाकरिता महत्वाचं रक्ताचं घटक हे कार्य करत आहे त्यातच आपल्या शरीरातील एक एक रक्ताचा थेंब दुसर्‍याच्या जीवनाचा आधार बनुन एखादयाच्या घरातील जीवनाचा दिवा लावत आहे.रक्तदान ही सर्वात मोठी देणगी असून आयुष्यभराची पुण्या आहे जी बाजारात विकत मिळत नाही आणि रक्तदान केल्याने आपण समजतो की जीवनात आल्याने कोणाचंतरी जीवन वाचवून श्रेष्ठदान केलं यातंच खरं समाधान आपल्याला गगनात मावेनासे होते.रक्तदान करून जनसेवा आपण केली की श्‍वरसेवा असे मानून आपले रक्तदान दुसर्‍यांसाठी वरदान आहे.आजच्या युगात मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे हे आम्ही जाणले आहे त्यामुळे आमदार मा.श्री.किसनजी कथोरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रूग्णालय मुरबाड,मुरबाड व डोंबिवली ब्लड सेंटर कॉम्पोनेंट अफेरेसिस सेंटर यांच्या संयुक्त विद्दयमाने,दै.पॉवर ऑफ लोकशाही वृत्तपत्राच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजीत केले आहे.या रक्तदान शिबीरात प्रमुख अतिथी,मान्यवर उपस्थित राहणार असून आमदार श्री.किसनजी कथोरे यांच्यावर सर्व नागरिक,कार्यकर्ते,समाजसेवक यांचे अतुट प्रेम आहे त्यामुळे आमदार श्री.किसनजी कथोरे साहेब यांच्यावर प्रेम करणारे सर्व इच्छुकांनी या रक्तदान शिबीरात रक्तदाते होऊन रक्तदान करून या भव्य रक्तदान शिबीराला यशस्वीरित्या राबविण्याचा संकल्प करून सहकार्य करूया.जे रक्तदाते रक्तदान श्रेष्ठदान करण्यास इच्छूक असतील त्यांनी दि.14/09/2025 पर्यंत मुरबाड ग्रामीण रूग्णालयाचे वैद्दयकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे,तानाजी भोर(9226156341),भाऊ हरड (9270215823) यांच्याशी संपर्क साधून नावे व नंबर देऊन नोंदणी करावी असे आवाहन आयोजक कुणाल शेलार(पत्रकार) यांनी केले आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post